शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झालाय प्रसाद खांडेकर, अभिनेत्याच्या संस्कारांचं कौतुक, कोकणातील घराची दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2025 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra actor

Video : गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झालाय प्रसाद खांडेकर, अभिनेत्याच्या संस्कारांचं कौतुक, कोकणातील घराची दिसली झलक

Maharashtrachi Hasyajatra actor : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार हे कोकणातील आहेत. आणि ही कलाकार मंडळी शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत बरेचदा कोकणात त्यांच्या मूळ गावी जाताना दिसतात. सध्या गणेशोत्सवाची कोकणात अधिक धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच अनेक कलाकार हे त्यांच्या कुटुंबासह कोकणात पोहोचले आहेत. निखिल बने, प्रसाद खांडेकर, तितीक्षा तावडे, अंशुमन विचारे, छाया कदम, ही कलाकार मंडळी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या कोकणच्या घरी पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवासाठी प्रसाद गावी गेला आहे. आणि कोकणात तर या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. भजन हा तर साऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. गणेशोत्सवासाठी गावी संपूर्ण कुटुंब एका छताखाली आल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर भजनासाठी गावकरी, नातेवाईकही जमतात आणि भेटीगाठी होतात. प्रसादही सध्या शूटिंगमधून ब्रेक घेत गावी कुटुंबाला वेळ देत आहे. याची झलक त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईची आवडती व्यक्ती कोण?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “आम्ही दोघी…”

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

“गणपती मधलं गावच भजन म्हटलं की एकदम काळजाला हात घालणारा विषय. आवडती गोष्ट भजन”, असं कॅप्शन देत त्याने टाळ वाजवत भजन म्हटलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ जमलेले उपस्थित भजन म्हणताना दिसत आहेत. यावेळी प्रसाद भजन म्हणताना तल्लीन झालेला दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादच्या कोकणातील घराची झलकही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – वय वर्ष १५, लेडीज डब्यात तो आला आणि…; लोकल ट्रेनमधील छेडछाडीबाबत टीव्ही अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “स्पर्श करण्याचा…”

प्रसादचे कोकणातील घर हे कौलारू असून या घराला पारंपरिक टच आहे. गावाकडे गणेशोत्सवात करण्यात येणारे डेकोरेशन यावेळी करण्यात आले आहे. इतकंच नाही तर रात्री खूप उशिराही सगळे जागरण करत गणेशाची सेवा आणि एकत्र आल्यानंतरची धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. प्रसादने कोकणची संस्कृती दाखवल्याने अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “हा जो आनंद आहे कुठेही शोधला तरी मिळत नाही. हा इथेच मिळतो”, “जमिनीवर पाय असलेला कलाकार प्रसाद भाऊ”, अशा कमेंट त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

Tags: kokanmaharashtrachi hasyajatraprasad khandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
rubina dilaik family and twin daughters

तीन दिवस लाईट नाही, नेटवर्क नाही; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जुळ्या मुली आई-वडिलांसह अडकल्यात हिमाचलला, म्हणाली, "पावसाने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.