jui gadkari fav person on set : ‘ठरलं तर मग’ मालिका नेहमीच प्रेक्षकांची आवडती मालिका राहिली आहे. गेली अडीच वर्ष ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सायली-अर्जुनच्या जोडीला तर भरपूर प्रेम मिळालं आहे. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील सायली या पात्राने जुईला खूप लोकप्रियता मिळाली. सेटवरही जुई सगळ्यांशी मिळून मिसळून वागताना दिसते. यावरुन मालिकेतील कलाकारांचं एकमेकांशी ऑफस्क्रीन चांगला बॉण्ड असलेला पाहायला मिळतो. अशातच जुईने घेतलेल्या आस्क मी सेशनमध्येही तिने सेटवरील तिच्या आवडत्या व्यक्तीचा नावाचा खुलासा केला आहे.
जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतले. यावेळी जुईने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर तुला कोण जास्त आवडतं, अशी एक मैत्रीण, जिच्याशी तू मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने शेअर करतेस? त्या व्यक्तीचं नाव काय?’, असा प्रश्न विचारला. मालिकेत जरी सायलीच्या सगळ्यात जवळची व्यक्ती अर्जुन असली तरी ऑफस्क्रीन सायली म्हणजेच जुईची सगळ्यात जवळची मैत्रीण तिची सासूबाई कल्पना आहे. प्राजक्ता दिघे यांच्याशी तिचं खूप छान बॉण्डिंग आहे.
आणखी वाचा – प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन, भारतात महिला की पुरुष गटांत प्रमाण कर्करोगाचे प्रमाण अधिक, जाणून घ्या…

यापूर्वीही जुईने प्राजक्ताबरोबरचे अनेक फोटो, बीटीएस व्हिडीओ शेअर केले आहेत. प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत जुई लिहिते, “मी माझ्या मनात फार काही ठेवतच नाही. पण प्राजू मला सेटवर आईची कमी भासू देत नाही. माझे खूप लाड करते आणि हो वेळ पडल्यास ओरडते सुद्धा. मी तिच्याशी खूप गप्पा मारते. आम्ही दोघी रुम पार्टनर्स सुद्धा आहोत”.
दुसऱ्या एका नेटकऱ्याने जुईला, “आतापर्यंतची तू काम केलेली तुझी सर्वात आवडती मालिका कोणती आहे?” असाही प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या सगळ्याच भूमिकांवर खूप प्रेम केलंय आणि सगळ्या मालिकांमध्ये मनापासून काम केलं. पण, ज्या भूमिकेने माझ्यावर प्रेम केलं ती आहे सायली. सायलीने मला सगळं काही दिलं ज्याची मी वाट पाहत होते”.





