आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करून पुन्हा दोन विजय मिळवत संघाला या स्पर्धेत जिवंत ठेवलं होतं. मात्र चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईला हार पत्करावी लागली. या सामन्यात चेन्नईचा पूर्व कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा जुना अंदाज पाहायला मिळाला. धोनीच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईने २०० धावांचा डोंगर उभा करत मुंबईच्या अडचणींमध्ये भर पाडली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मुंबईचा पूर्व कर्णधार रोहित शर्माने शतकीय खेळी करत मुंबईला विजय मिळून देण्यासाठी संघर्ष केला. (Rohit Sharma Funny Moment)
या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा शतकासह चर्चेत राहिला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करताना घडलेल्या एका मजेशीर कृत्यामुळे. अत्यंत जलद गतीने चेंडू रोखण्यासाठी रोहित शर्मा धावत असताना त्याची पॅन्ट खाली आली आणि मैदानात एकच हशा पिकला. पॅन्ट खाली आली तरीही चेंडू पकडत संघासाठी तीन धावा अडवण्यात रोहितला यश आले. रोहितचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद राहत शतक झळकावले पण इतर कोणत्याही फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
Funny moment with Rohit Sharma 😂😂#CSKvsMI pic.twitter.com/sPmtDhSwH8
— Mukesh (@mukesh_077) April 14, 2024
चेन्नईच्या प्रतिमलिंगाची दमदार गोलंदाजी
चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील आक्रमक मारा करत मुंबईच्या विजयाची गती थांबवली. प्रति मलिंगा म्हणून ओळख असणाऱ्या मथीशा पथीराणाने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या चार फलंदाजांना बाद केले. चेन्नईच्या तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा या गोलंदाजांनी देखील उत्तम गोलंदाजीची प्रदर्शन केले. (Rohit Sharma Funny Moment)
धोनी-रोहितची पैसावसूल फलंदाजी
या सामन्याच्या सुरु होण्यापूर्वी सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे या सामन्यात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या फलंदाजीकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले होते. हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकात धोनी मैदानावर आला आणि वानखेडे स्टेडियमवर एकच आवाज घुमू लागला. धोनीने देखील आक्रमक रूप धारण करत सलग तीन षटकार मारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि चेन्नईच्या संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. तसेच रोहित शर्मा देखील त्याच्या हिटमॅन अंदाजात फलन्दजी करताना पहायला मिळाला. संघाला यश मिळाले नाही तरीसुद्दा रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत दणदणीत शतक झळकावले आणि उपस्थित चाहत्यांच्या चेहऱ्यावर एकच समाधान पाहायला मिळाल.