शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेले सिद्धार्थ व तितीक्षा, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष, राहत असलेल्या ठिकाणची खास झलकही दाखवली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 14, 2024 | 1:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Titeeksha Tawde and Siddharth Bodke shared special photo from Goa after their marriage

लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेले सिद्धार्थ व तितीक्षा, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष, राहत असलेल्या ठिकाणची खास झलकही दाखवली अन्...

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने दोन महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तितीक्षा-सिद्धार्थ यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच आता दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांचे काही आणखी फोटो शेअर केले आहेत. तितीक्षा-सिद्धार्थ लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला गेले आहेत. लग्नानंतर हे जोडपे कुठे बाहेर फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले नाही. अशातच आता दोघे गोव्याला फिरायला गेले आहेत.

आणखी वाचा – मृण्मयी देशपांडेने पतीसह महाबळेश्वरच्या शेतात थाटला संसार, शेणाने व मातीने बांधलेल्या घरात साजरा केला यंदाचा गुढीपाडवा, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “काहीतरी नवं…”

तितीक्षा-सिद्धार्थ या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ते राहत असलेल्या ठिकाणचा खास फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तितीक्षा-सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढत गोवा इथे फिरायला गेले असून दोघेही एकमेकांबरोबर लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करत आहेत. नुकताच तितीक्षा-सिद्धार्थ यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला होता. तितीक्षाच्या सासरी म्हणजेच नाशिकमध्ये हा सण साजरा केला. याचे खास खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

आणखी वाचा – सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार, मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय, घराबाहेरील सुरक्षा वाढवली

अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या गोव्यामधील फोटोंनी त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर सिद्धार्थचा लवकरच ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.           

Tags: marathi entertainment newssiddharth bodketiteeksha tawde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Sankarshan Karhade shared special video of his two twins on social media.

आता अशी दिसतात संकर्षण कऱ्हाडेची जुळी मुलं, लेकाचा व लेकीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "मी यांच्याइतका लहान होतो तेव्हा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.