बरीच कलाकार मंडळी ही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे विशेष चर्चेत असतात. अशातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक देखील तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. मानसी नाईक हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मानसी वैयक्तिक कारणामुळे बरेचदा चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी मानसीने परदीप खरेराबरोबरच्या नात्याला पूर्णविराम दिला. दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली. (Manasi Naik Boyfriend)
मानसीने प्रदीप खरेराशी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र काही वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. यानंतर आता मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मानसीने काही दिवसांपूर्वीच आयफेल टॉवर जवळचा खास फोटो शेअर केला होता. या फोटोवर दिलेल्या कॅप्शनने ती प्रेमात पडली असल्याचं जाणवत होतं. मात्र तिने अद्याप प्रेमाची कबुली दिली नव्हती. मात्र मानसीने ती पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याची कबुली मुलाखतींद्वारे दिली आहे. अशातच आता मानसीबरोबरचा तिच्या मिस्ट्री मॅनचा फोटो समोर आला आहे. राहुल खिसमतराव असे नाव असलेल्या या मिस्ट्री मॅनबरोबरचा मानसीचा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.
राहुल आणि मानसीने खास रोमँटिक असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केल्याने मानसीचा हा कथित बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जातं आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये मानसी व राहुल हे आयफेल टॉवर जवळ उभे असून रोमँटिक पोज देत फोटो काढताना दिसले. तर हा फोटो राहुलने त्याचा इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. “माझं प्रेम मी एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे”, असं म्हणत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर मानसीने देखील राहुलची ही स्टोरी रिपोस्ट केलेली पाहायला मिळत आहे. मानसीचा मिस्ट्री मॅन आता समोर आला असल्याचं दिसत आहे.
मानसीने काही दिवसांपूर्वी ‘अमृता फिल्म’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीने तिच्या आयुष्याबाबत बरंच भाष्य केलं. यावेळी मानसीने प्रेमाचाही खुलासा केला. ती म्हणाली होती की, “प्रेम खूप छान असतं. प्रेमाला कोणतीही परिभाषा नसते. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते. माझ्यासाठी ही व्याख्या खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे. प्रेमात ते प्रेम योग्य आहे की नाही हे ओळखायला हुशारी लागते. आणि जे काही करायचं आहे ते आता डोळे बंद करून नाही तर डोळे उघडून करायचं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. त्यामुळे प्रेमात पडा असं मी आवर्जून सांगते”.