शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या दारुच्या व्यसनामुळे…”, पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, “आमचं नातं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Javed Akhtar On First Wife

"माझ्या दारुच्या व्यसनामुळे…", पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, "आमचं नातं…"

गीतकार जावेद अख्तर यांनी आजवर त्यांच्या गीतांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. जावेद अख्तर यांनी दोनदा लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी हनी इराणी आहे, जिच्याशी त्यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्या फरहान अख्तर व झोया अख्तर यांची आई आहे. एका संभाषणात जावेद अख्तर यांनी त्याच्या पहिल्या पत्नीबरोबरच्या नात्याबद्दल सांगितले, त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर त्यांचे मैत्रीपूर्व संबंध आहेत. जावेद अख्तरप्रमाणेच हनी इराणीनेही अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. (Javed Akhtar On First Wife)

जावेद अख्तर यांनी ‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर ते गंभीर व्यक्ती असते किंवा दारूच्या व्यसनाचा बळी गेले नसते तर हनी इराणीबरोबरचे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले नसते. ते म्हणाले, “मला खात्री आहे की जर मी अधिक जबाबदार असतो तर कथा वेगळी असती. दारूचे व्यसन हे देखील या अयशस्वी संबंधाचे कारण होते. ती एक अद्भुत व्यक्ती आहे. मला तिच्याबद्दल खूप आदर आहे. त्यामुळेच आजही आम्ही चांगले मित्र आहोत”.

आणखी वाचा – “न्यूड सीन करणाऱ्यांना…”, रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारण्यावरुन भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, “दुसऱ्या देशात जा आणि…”

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

त्यांची नात शाक्य अख्तरच्या पदवीदान समारंभाला जावेद व हनी इराणी उपस्थित होते. दोघांनी एकत्र काढलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत शबाना आझमीही दिसल्या होत्या. जावेद व हनी यांचा विवाह १९७२मध्ये झाला होता. दोघांना दोन मुले असून त्यांची नावे फरहान अख्तर व झोया अख्तर आहेत. दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहेत. १९८४मध्ये जावेद व हनी यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर त्यांनी शबाना आझमी यांच्याशी लग्न केले.

आणखी वाचा – विमानतळावर असलेल्या टीव्हीवर सुरु होता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, ‘ते’ दृश्य पाहून भारावले समीर चौघुले, सेल्फीही घेतला अन्…

जावेद अख्तर यांनी दारू सोडण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांनी एक थेंबही दारू प्यायली नाही. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे तर जावेद यांनी राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटासाठी ‘निकले दी कभी हम घर से’ हे गाणे लिहिले होते. हे गाणे शाहरुख खान व तापसी पन्नूवर चित्रित करण्यात आले आहे, तर हे गाणे सोनू निगमने गायले आहे आणि प्रीतमने संगीत दिले आहे.

Tags: entertainmentjaved akhtarjaved akhtar familyJaved Akhtar On First Wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Gurdas Maan On Sidhu Moosewala Younger Brother

सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला मुलाला जन्म, सुप्रसिद्ध गायक भेटायला जाताच म्हणाला, “आता कुटुंबाला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.