भाऊबंदकी म्हणलं कि भांडण, वाद असा जणू काय पायंडाच पडला आहे पण काही कुटुंब या गोष्टीला अपवाद ठरतात. असेच तीन भाऊ आज आपापल्या क्षेत्रात महत्वाच्या भूमिकेत असून देखील एकमेकांशी तितक्याच आपुलकीने जोडलेले आहेत. या ३ भावांमधील एक भाऊ म्हणजे मनोरंजन क्षेत्रात आघाडीचा अभिनेता असणारा रितेश देशमुख. रितेश देशमुख, धीरज देशमुख, आणि अमित देशमुख महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मानाचं स्थान असलेले स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे हे तीन चिरंजीव राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात आज आघाडीवर दिसत आहेत.(Ritesh Deshmukh Brothers)
धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे राजकारणात सक्रिय असून रितेश हा हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाजवण्यात व्यस्त आहे. म्हणतात सत्येत असो वा नात्यात राजकारण आलं कि फूट पडते पण देशमुख कुटुंब या गोष्टीला अपवाद ठरलं आहे. भावाभावांमधलं प्रेम दर्शवणारी एक पोस्ट रितेश ने त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. नुकताच रितेशचे बंधू धीरज यांचा वाढदिवस होता.

त्या निम्मिताने धीरज आणि अमित यांच्या सोबतचा लहानपाणीचा फोटो आणि एक हल्लीचा फोटो शेअर केला असून त्या फोटोजच्या कॅप्शन मध्ये ‘प्रिय धीरज आम्ही दोघे नेहमी तुझ्या आजू बाजूला असू तुझ्या मजबूत बाजू म्हणून आम्ही नेहमी उभे असू’. भावा भावांमध्ये असलेलं असं प्रेम हल्ली कमी ठिकाणी पाहायला मिळत. रितेश ने पोस्ट केलेल्या या फोटोंमधून भावाभावांमधलं प्रेम वाढवायला मदत करेल एवढं नक्की.(Ritesh Deshmukh Brothers)