शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही आवाहन केलं अन्…; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 20, 2024 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Riteish, Genelia Deshmukh, Ashok, Nivedita Saraf, Aadesh Bandekar, Hemant Dhome, Subodh Bhave, Sayli Sanjeev, Prajakta Mali, Tejaswini Pandit and Sonalee Kulkarni shared photos after voting.

सामान्य नागरिकांसह मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही बजावला मतदानाचा अधिकार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकांची मोठी चर्चा होती. महाराष्ट्रात आता सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. याच निवडणुकांचं आज मतदान पर पडत आहे. प्रत्येक नागरिकाचे मत हे मौल्यवान आहे, त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. आज सामान्य नागरिकांसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला. याचे काही खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच सर्व चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहनही केलं आहे. (Marathi Artist Vote Photos)

रितेश व जिनिलिया देशमुख यांनी लातूर विधानसभेसाठी मतदार केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे रांगेत उभं राहून यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन या जोडीनं केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासह मतदान केलं. याचे फोटो शेअर करत तिने एक चारोळीही केली. “करा आज योग्य selection…Today is the day of election…समाजात हवं असेल जर perfection…तर करु नका या संधीचं rejection”, अशी चारोळी सोनालीने केली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – ए. आर. रहमानच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर अशी झालीय मुलांची अवस्था, पोस्टद्वारे व्यक्त केलं दु:ख, म्हणाले, “तुमच्या प्रार्थनेत…”

अभिनेता, दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमेनेही मतदान केल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करत “माझं मत… ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मासाठी! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी!” असं म्हटलं आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही मतदानाचा फोटो शेअर करत तिने असं लिहिलं आहे की, “मी मतदान केलं. लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्र सोडवा”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “हा ‘विनोद’…”

अभिनेता सुबोध भावे याने सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यानंतर सुबोध भावेने नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनीही पत्नी नेहा देशपांडे यांच्यासोबत मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. याचबरोबर रवी जाधव, प्राजक्ता माळी, सायली संजीव, बांदेकर व सराफ कुटुंबियानीही मतदान केले. वैदही परशुरामी, उमेश व प्रिया बापट, जुई गडकरी, सावनी रवींद्र अशा अनेकांनी आज मतदान केले आहे.  

Tags: Maharashtra Election 2024Maharashtra Election 2024 VoteMarathi Artist Vote Photos
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Marathi actress Mithila Palkar shared a post on social media about not being able to vote for some reason

“यावेळी मतदान करु शकणार नाही पण...”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुर्दैवाने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.