आज २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात आज मतदान सुरु झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नागरिकांनी मतदान करत आपला हक्क आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावल्याचं दिसून आलं. या कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मतदानानंतरचे सेल्फी व फोटो कलाकारांनी शेअर केले आहेत आणि सर्वांना मतदान करण्याचे अवहानही केले आहे. (Mithila Palkar Not Able To Vote)
मात्र यादरम्यान एका अभिनेत्रीची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अभिनेत्री मिथिला पालकरला तिचा यंदाचा मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही अआणि याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मिथिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही आवाहन केलं अन्…; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आजच्या दिवशी सगळे मतदानासाठी बाहेर पडले असताना मिथिला मात्र मतदान करु शकणार नाही असं तिने म्हटलं आहे. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे आणि याद्वारे तिने असं म्हटलं आहे की, “मी यावेळी मत देऊ शकत नाही. दुर्दैवाने वेळच चुकीची आहे. पण महाराष्ट्र, कृपया जमलं तर तुम्ही मतदान नक्की करा. आपल्यासाठी मत द्या. कारण आपण अनेक चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत”. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात मिथिलाच्या मतदान न करण्यामागचे कारण समजू शकलेलं नाही.
पण अभिनेत्री सध्या परदेशात असल्याचं तिच्या आधीच्या स्टोरीवरुन कळत आहे. ती सध्या नॉर्वेमध्ये आहे. यामुळे मिथिला यावेळी मतदानापासून वंचित राहिली आहे. दरम्यान, रितेश व जिनीलिया, रवी जाधव, प्राजक्ता माळी, सायली संजीव, बांदेकर व सराफ कुटुंबिय तसंच सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, उमेश व प्रिया बापट, जुई गडकरी, सावनी रवींद्र अशा अनेकांनी आज मतदान केले आहे.