कलाकार म्हणलं कि एक गोष्ट आपसूक जोडली जाते ती म्हणजे अफवा. हिंदी असो वा मराठी अनेक कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अनेक अफवांचा सामना करावा लागतो. या विनाकारण पसरणाऱ्या अफवांना काही कलाकार जोरदार प्रतिउत्तर देतात तर काहीजण या कडे लक्षही देत नाहीत. सध्या अशीच एक अफवा सर्वत्र पसरते ती म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जोडी बद्दल म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या बद्दल.(riteish deshmukh and genelia d’souza)
नुकतंच एका कार्यक्रमासाठी रितेश- जिनिलियाने हजेरी लावली होती. दरम्यान फोटोग्राफर मंडळींनी या दोघांना फोटो काढण्यासाठी एकत्र बोलावलं आणि रितेश-जिनिलीयाचे हे फोटोज सर्वत्र चांगलेच व्हायरल झाले. हे व्हायरल झालेले फोटो पाहून काहींनी जिनिलिया गरोदर असल्याची अफवा पसरवली. यावर खुद्द रितेशनेच पोस्ट करत मौन सोडलं. रितेश जिनिलीयाच्या व्हायरल फोटोवर ‘जिनिलीया प्रेग्नन्ट?’ अशी टिप्पणी केली. यावर मौन सोडतं रितेशने एक फोटो पोस्ट करत त्यावर लिहिलं “मला आणखी २, ३ मुलं असती तरीही काही हरकत न्हवती पण दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे”.

हे देखील वाचा- “बाळा तुला…”, बायकोच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, खास गिफ्टही दिलं अन्…
रितेश- जिनिलीया ही जोडी प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांपैकी एक आहे. अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यांनी आजवर अनेक हिंदी सिनेमे केले असून ‘वेड’व्यतिरिक्त ही जोडी ‘लईभारी’ सिनेमातील एका गाण्यात दिसली. जिनिलीया सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ती या सिनेमानंतर मराठी सिनेमांच्या निर्मितीकडे लक्ष देणार आहे.(riteish deshmukh and genelia d’souza)
हे देखील वाचा – “पुरुषांनीही नमून राहिलं तर हरकत काय?”, मधुराणी प्रभुलकरांचं विधान ठरलं होतं चर्चेचा विषय, म्हणाल्या, “स्त्रीचं दुःख…”
वेड चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख ने दिगदर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आणि त्याच्या पाहलियाच कलाकृतीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि मराठी चित्रपट अजून समृद्ध होत गेला त्याच प्रमाणे मराठीतील सगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना असच वेड लावावं एवढंच.(riteish deshmukh wife)