रिंकू कायमच तिच्या अभिनया व्यतिरिक्त तिच्या वेगवेगळ्या लूक्स साठी चर्चेत असते.सैराट या तिच्या पहिल्याच चित्रपटाला घसघशीत यश मिळालं. आणि आर्चीने, रिंकू राजगुरू नावाला ओळख मिळवून दिली. त्या नंतर एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट, वेब्सिरीज रिंकूने केल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा मिळवली.(Rinku Rajguru Viral Video)
आठवा रंग प्रेमाचा, सैराटचा दाक्षिणात्य भाषेत रिमेक, हंड्रेड हि वेबसिरीज असे अनेक प्रोजेक्ट्स केले, तरी आर्ची म्हणून आजही तिची ओळख तशीच आहे. सध्या रिंकू खिलार चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटातून रिंकू आणि ललित प्रभाकर ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांना एकत्र पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.या चित्रपटाची देखील सोशल मीडियावर जोरदार चढच सुरु आहे.
पाहा रिंकूचा मराठमोळा साज आणि हटके अंदाज(Rinku Rajguru Viral Video)
याच सोबत रिंकू तिच्या ट्रेडिशनल लुक्सने कायम प्रेक्षकांचं मन जिंकते.असाच एक ट्रेडिशनल लुक मधला व्हिडिओ रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. त्यात रिंकूने मराठमोळा साज केला आहे, आणि ती कार ड्राईव्ह करते आहे. या व्हिडिओला तिने ‘लेट्स गो फॉर लॉन्ग ड्राईव्ह विथ नो डेस्टिनेशन’ असं कॅप्शन दिलं आहे. मराठी मुलगी, सैराटच हँगओव्हर अजून उतरला नाही अशा कमेंट्स करून प्रेक्षकांनी तिच्या या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.(Rinku Rajguru Viral Video)

चित्रपट क्षेत्राची पार्श्ववभूमी नसताना, नागराज मंजुळेने सोपवलेली जबाबदारी रिंकूने लीलया पेलली. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकू थांबली नाही. सातत्याने ती तीच काम करते आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षक आपलस करता. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे नवीन नवीन भूमिका घेऊन रिंकू येत असते.
हे देखील वाचा : गर्ल चिलींग इन समर… रिंकूचा समर लुक तुम्ही पाहिलात का ?