महाराष्ट्राची हास्याची राणी म्हणून ज्या अभिनेत्रीची ओळख आहे ती म्हणजे रेणुका शहाणे. तिच्या हसतमुख व्यक्तिमत्वावर, गालावरच्या खळीवर प्रेक्षक आजही घायाळ आहेत. रेणुका शहाणे हे सिनेसृष्टीमधील एक महत्वाचं नाव आहे. सुरभी या शो मधून त्या प्रकाशज्योतात आल्या.हळू हळू त्यांनी मराठी, हिंदी सिनेसृष्टीत आपले पाय चांगलेच रोवले. त्या अनेक मराठी,हिंदी, चित्रपट , मालिका त्यांनी केल्या. त्याच सोबत अनेक शो मध्ये त्यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. (Renuka Shahane)
हे असे असले तरी रेणुका शहाणे हे नाव कायमस्वरुपी लक्षात राहील ते त्यांच्या ‘हम आपके है कोण ‘ या चित्रपटासाठी. सलमान खान, माधुरी दीक्षित, यांच्या सोबत तोडीस तोड अशी भूमिका होती रेणुका शहाणे यांची. माधुरी दीक्षितची मोठी बहीण आणि सलमान खानची वहिनी असण्याची जबाबदारी त्यांनी या चित्रपटात चांगलीच निभावली आहे. हा चित्रपट पाहिल्या नंतर आपल्याला ही अशी वहिनी आणि बहीण असावी असं वाटल्या शिवाय राहत नाही. आज ही चित्रपट बघताना त्यांचा जिन्यावरून पडण्याच्या त्या सीनला डोळ्यातून पाणी आणि अंगावर काटा आल्या शिवाय रहात नाही.त्यात संपूर्ण चित्रपटात त्यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यवरून नजर हटत नाही.
हे देखील वाचा : ‘शरीरप्रदर्शन करायची माझी….’म्हणून अलका कुबल यांनी नाकारले हिंदी चित्रपट
अभिनेत्री म्हंटल की ती व्यक्ती आत्मविश्वासू असणार, बोलकी असणार, लोकांमध्ये लगेच मिसळणारी असणार याच सर्व कल्पना डोळ्या समोर येतात. परंतु रेणुका शहाणेंनी एका मुलाखतीत त्यांच्या लहानपणीच्या स्वभावाचा आणि त्यांच्या नावा मागच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्या असं म्हणतात, लहानपणी त्या भयंकर आळशी होत्या, कामाचा कंटाळा होता, परंतु आता काम करताना सकाळी लवकर उठते. रात्री उशिरापर्यंत काम करते. तेही अगदी आवडीने. लहानपणी त्या तशा मनमोकळ्या असल्या तरी अबोल होत्या, आपली मत आपल्या पर्यंत सीमित ठेवायची. लोकांना बोलून दाखवायची नाहीत. म्हणून त्यांच्या अनेक नातेवाईकांना असे वाटायचे की रेणुका मोकळी आहे, हसरी आहे पण मठ्ठ आहे त्या उलट गिरीश हुशार आहे. गिरीश म्हणजे रेणूकांचा धाकटा भाऊ. पण तो त्यांना कायम म्हणायचा तू खूप हुशार आहेस आणि तुझी हुशारी वेगळी आहे. (Renuka Shahane)
पाहा काय आहे रेणुकांच्या नावा मागची गोष्ट ? (Renuka Shahane)
त्यांचे बरेचसे नातेवाईक त्यांना ‘उमा’ म्हणायचे, परंतु त्यांची आई आणि भाऊ मात्र त्यांना ‘रेणुकाच’ म्हणायचे.त्यांच्या वडिलांना, राजकारणात गाजलेल्या एका स्त्रीचच नाव आपल्या मुलीला ठेवायचं होत. त्यांनी हेलन, रोजा, रेणुका, इंदिरा अशी नाव सुचवली. त्यावर त्यांची आई म्हणाली- मग रेणुकाच. त्यामुळे त्यांच नाव रेणुका ठेवलं गेलं. परंतु रेणुकांच्या आजीने म्हणजे आईच्या आईने त्यांना पाहिलं, तेव्हा त्या म्हणाल्या, ही किती नाजूक आहे. हिला रेणुका नाव शोभत नाही. हिला लहान, सोपं आणि गोड नाव ठेवलं पाहिजे. मग त्यांनीच रेणुकानंच नाव ‘उमा’ असं ठेवलं. (Renuka Shahane)
रेणुकांच्या काकांनाही दोन मुलीचं होत्या. त्यामुळे रेणुकांच्या भावाचा जन्म झाल्यावर त्यांच्या वडिलांच्या आई अतिशय खुश झाल्या होत्या. ‘कुलदीपक’ म्हणून त्याचे खूप लाड केले गेले होते. परंतु रेणुकानी मिश्कीलपणे सांगतात, त्याच वेळी मी मनाशी ठरवलं होत, की एक दिवस मी रेणुका शहाणे नावानेच कुळाचा उधार करणार .आणि खरंच त्या इतक्या मोठया झाल्या की, त्यांनी त्यांच्या अस्तित्वाने घराघरातल्या टीव्हीचा पडदा व्यापून टाकला. (Renuka Shahane)
हे देखील वाचा : ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार