Rekha Birthday Special : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रेखा यांनी आपला अभिनय व अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. आज जरी त्या ६९ वर्षाच्या असल्या, तरी त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस हा तरुणींना देखील लाजवेल असा आहे. त्यांचं फिल्मी आयुष्य जितकं चर्चेत राहिलं, तितकंच त्यांचं खासगी आयुष्यदेखील बरंच चर्चेत राहिलं. रेखा यांचं नाव आज सर्वत्र आदराने घेतलं जात असला, तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. (Rekha Birthday Special)
रेखा यांचे खरे नाव नाव भानुरेखा जेमिनी गणेशन असं असून त्या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते जेमिनी गणेशन व अभिनेत्री पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. पण, जेमिनी यांनी रेखाचा मुलगी म्हणून कधीच स्वीकार केला नाही. कारण, जेव्हा त्यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे लग्न झाले नव्हते. उलट जेमिनी यांचं याआधी चार वेळा लग्न झाली होतं. पण, कधीही त्यांनी रेखाच्या आईशी अधिकृत लग्न केले नव्हते. त्यामुळे त्यांनी रेखाला आपली मुलगी मानण्यास नकार दिला होता. म्हणून, जेव्हा रेखा यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा रेखा यांनी वडिलांच्या निधनावर दुःखही व्यक्त केलं नव्हतं. त्याचबरोबर ती तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालादेखील गेली नव्हती.
हे देखील वाचा – “माझा आगाऊपणा वाढला आणि…”, सुचित्रा बांदेकरांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट, म्हणाला, “तुझी सहनशीलता…”
त्यावेळेस बोलताना रेखा यांनी सांगितलं होतं की, “मी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त का करावं? त्यांचं आणि माझं काही नातं नव्हतं, माझ्या जीवनात त्यांचं विशेष योगदानही नव्हतं. तसेच मला या गोष्टीचा दिलासा आहे की, माझा त्यांच्याबरोबर कोणत्याही वाईट क्षणांचा अनुभव नसून वडील हे फक्त माझ्या कल्पनेतच होते.”, असं म्हणत रेखा यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचे नाते जगासमोर आणले होते. त्यामुळेच रेखा ह्या त्यांच्या नावापुढे त्यांच्या वडिलांचं नाव लावत नाही.
हे देखील वाचा – “स्वतःच्या मुलीसारखं मला…”, जिनिलीया देशमुखची सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली, “माझी मराठी भाषा सुधारण्यासाठी तुम्ही…”
वडिलांच्या नकारानंतर रेखा व त्यांच्या आईला अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागले होते. त्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तर अवघ्या १३व्या वर्षी त्या मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकल्या. तब्बल पाच दशंकांच्या या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये तब्बल ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर नाव कोरला आहे.