बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. ‘एक था टायगर’चा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर व टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले, जे चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले. अशातच, या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळते. (Tiger 3 Katrina First Look)
सलमान खान व कतरीना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक था टायगर’ २०१२ साली प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच खळबळ माजवली होती. त्यानंतर २०१७ मध्ये याचा दुसरा भाग ‘टायगर जिंदा है’ आला होता, ज्याने ४०० कोटींची रेकॉर्डतोड कमाई केली होती. टायगर आणि झोयाची ही जोडी चाहत्यांना प्रचंड भावली होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पहिला पोस्टर आल्यानंतर आता अभिनेत्रीचा फर्स्ट लुक समोर आला आहे. ज्यात कतरीना दमदार अंदाजात पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीनची प्रकृती बिघडली, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, शेअर केला फोटो
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कतरिनाचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत, तिच्या एका हातात दोरखंड आणि दुसऱ्या हातात बंदूक पकडताना दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचबरोबर, येत्या १६ ऑक्टोबरला ‘टायगर ३’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने या पोस्टमध्ये दिली आहे. चित्रपटाचं हे पोस्टर व्हायरल होत असून चाहते या पोस्टरवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Rekha Birthday : वडिलांचं निधन झालं तरीही रडल्या नाहीत रेखा, स्वतःच खुलासा करत म्हणालेल्या, “त्यांचं आणि माझं नातं…”
‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत असून यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा पाचवा चित्रपट आहे. याआधी स्पाय युनिव्हर्सचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’,’ वॉर आणि ‘पठाण’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात सलमानसह कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नाही. पण दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट हिंदी, तमिळ व तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.