सध्या सिनेसृष्टीत कलाकार मंडळींची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळालं. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Titeeksha Tawde And Siddharth Bodke)
तितीक्षाने थेट केळवणाचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तितीक्षा तावडे अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी दोघांनी बरेचदा एकमेकांबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत, त्यावरुन चाहत्यांनी अनेकदा त्यांच्या प्रेमाबाबत चर्चा केली होती. मात्र तेव्हा दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. आता मात्र तितीक्षा व सिद्धार्थने त्यांच्या या डेटच्या चर्चांना पूर्णविराम देत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं आहे.
‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा यांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेमध्ये काम करताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी बरेचदा एकत्र फोटोही शेअर केलेले पाहायला मिळाले. सिद्धार्थने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतही सिद्धार्थ झळकला होता.
सिद्धार्थने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह दृश्यम या चित्रपटातही काम केलं आहे. त्याच्या या भूमिकेचं ही भरभरुन कौतुक करण्यात आलं आहे. याशिवाय त्याच्या अनन्या या नाटकातील भूमिकेचंही कौतुक झालं. सिद्धार्थ व तितीक्षा लवकरच लागंनबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांची आणखी एक ही लाडकी जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.