बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या बरीच चर्चेत आलेली आहे. अभिनेत्रीची लेक राशा थडानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली. त्यानिमित्त ती एअरपोर्ट व अनेक ठिकाणी स्पॉट होताना दिसत आहे. या मायलेकी सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून या दोघी तेथील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहे. नुकतंच या दोघींनी ऋषिकेश येथे गंगा आरती व केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले असून या दर्शनाचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (raveena tandon and his daughter visits uttarakhand)
रवीना टंडन हिने मुलगी राशाबरोबर ऋषिकेशला पोहोचली होती. तेव्हा त्यांनी येथील परमार्थ निकेतन घाट येथे काही पुजारी व भाविकांबरोबर गंगा आरती केली. या मायलेकींचा गंगा आरती करतानाचा एक व्हिडीओ ‘ANI’ या न्यूज एजन्सीने शेअर केला. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये, रविना आणि राशा आरती करताना दिसत असून यावेळी राशा आईच्या मागे उभी असल्याचे दिसत आहे. तर त्या दोघींच्या मागे काही पुजारी व भाविक पूजा करताना दिसत आहे. या आरतीवेळी अभिनेत्रीने लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. तर लेक राशाने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस व त्यावर गुलाबी रंगाची जॅकेट परिधान केली होती.
हे देखील वाचा – ‘त्या’ मुलीला शोधणाऱ्याला सनी लिओनी हजारो रुपयांचं बक्षीस देणार, फोटोही केला शेअर, म्हणाली…
#WATCH | Uttarakhand: Actress Raveena Tandon performed Ganga Aarti at Parmarth Niketan Ghat in Rishikesh. (08.11)
— ANI (@ANI) November 9, 2023
(Video Source: Parmarth Niketan) pic.twitter.com/IrqxfcnJ1s
तर गंगा आरतीनंतर दोघींनी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरातील रुद्राभिषेक पूजा करण्यात आली होती. त्यानंतर मंदिरातून बाहेर पडताच काही भाविक व चाहत्यांनी सेल्फीसाठी त्यांना घेरलं होतं. दरम्यान, ‘ANI’ ने दिलेल्या माहितीनुसार, रवीनाने यावेळी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचं कौतुक केलं. खरंतर, ती राशाबरोबर बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेणार होती. पण काही कारणास्तव, त्यांनी हा दौरा रद्द करत परतीच्या प्रवासाला निघाले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर ती लेकीसह देवदर्शनाला निघाली.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनियाच्या वडिलांचे निधन, भावुक होत म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील…”
अभिनेत्रींच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच संजय दत्तसह ‘घुडचडी’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती अक्षय कुमारच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे लेक राशा अभिषेक कपूर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. जो पुढील वर्षी ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.