‘बिग बॉस १४’ शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या एका कठीण काळातून जाताना दिसते. कारण, पवित्राचे वडील कुशल पाल सिंह यांचे गेल्या ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते निवृत्त पोलिस अधिकारी होते. काही महिन्यांपूर्वी ते मुंबईतील राहत्या घरी काम करत असताना पडले, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाबद्दलची माहिती देताना तिला अश्रू अनावर झाले होते. (Bigg Boss fame Pavitra Punia father passed away)
वडिलांच्या निधनानंतर नुकतंच पवित्राने ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली. त्यावेळी ती बोलताना म्हणाली, “माझे बाबा आमच्या घरातील बाल्कनीची सफाई करत होते. ते करत असताना त्यांचा पाय घसरला, ज्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली. मात्र त्यांची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना घरी आणलं होतं. मात्र, ६ नोव्हेंबरला अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आणि माझ्या आईने मला तातडीने घरी बोलावलं. तोपर्यंत त्यांचे निधन झाले.”
हे देखील वाचा – ‘जवान’ फेम अभिनेत्री नयनतारा संतापली, शाहरुख खान व दीपिका पदुकोणलाच सगळं श्रेय मिळाल्याने घेतला मोठा निर्णय
पुढे ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाला सामोरे जात आहे. मला हे कळत नाही की, बाबांना नेमकं काय झालं. माझी आई आणि भाऊ यांनी त्यांची विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे आता मला माझ्या कुटुंबियांसाठी धाडसी राहावं लागणार आहे.” तसेच ती हेदेखील म्हणाली की, “माझे बाबा अत्यंत सकारात्मक विचारांचे व्यक्ती होते. वेळ कोणतीही असो, पण आयुष्यात कधीही हार मनू नका असं ते नेहमी सांगत आलेले आहे. त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक अडचणींवर त्यांनी यशस्वीरित्या मात केली आहे. माझे बाबा निवृत्त पोलिस अधिकारी असून ते गेल्या वर्षांपर्यंत काम करत होते. पुढे निवृत्तीनंतर ते माझ्यासह मुंबईत राहू लागले. मला अजूनही यावर विश्वास बसत नसून आता माझे बाबांचा हात आता माझ्या डोक्यावर नसल्याचं दुःख राहणार आहे.”
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मध्ये नव्या सदस्याची एण्ट्री होणार, मोठा ट्विस्ट, घरातल्या स्पर्धकाचीच पत्नी स्पर्धक म्हणून येणार
अभिनेत्री पवित्रा पुनिया ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात सहभागी झाली होती. २००८ मधील ‘स्प्लिट्सविला’ या शोमधून ती पहिल्यांदा आली. त्यानंतर ‘नागीन’, ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.