बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरांनी फराळ बनवताच नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाले, “ऐश्वर्याच्या हातचं म्हणजे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 10, 2023 | 9:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar New Video

दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरांनी फराळ बनवताच नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाले, "ऐश्वर्याच्या हातचं म्हणजे…"

सणवार आले की सगळ्यांचीच लगबग सुरु असते. घरोघरी सर्वत्र सणांसाठीची लगबग सुरु झालेली असते. अशातच आता दिवाळीनिमित्त सर्वांचीच जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळतेय. यांत कलाकार मंडळीही मागे नाहीत. ते त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून शेअर देखील केला आहे. (Aishwarya Narkar New Video)

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ऐश्वर्या यांनी नुकताच दिवाळीचा फराळ बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पोह्यांचा चिवडा बनवताना दिसत आहेत. पोह्यांचा चिवडा बनवतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर करत ‘फ्रेश चिवडा बनवला’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी व्हिडीओखली कमेंट करत त्यांच्या या कलेचंही कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – ‘त्या’ मुलीला शोधणाऱ्याला सनी लिओनी हजारो रुपयांचं बक्षीस देणार, फोटोही केला शेअर, म्हणाली…

पोह्यांचा चिवडा बनवताचा ऐश्वर्या यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवरील ऐश्वर्या नारकर यांचे पती अविनाश नारकर यांची कमेंट लक्ष वेधून घेतेय. अविनाश यांनी ऐश्वर्या यांची स्तुती करत तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अविनाश नारकर म्हणाले की, “अरे यार, ऐश्वर्याच्या हातचा चिवडा म्हणजे चखते रहे जाओगे”. शिवाय या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत ऐश्वर्या यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी ‘चिवडा आमच्या पर्यंत आला पाहिजे’ अशा कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – “तोच तोच पाणचटपणा…”, नाटकावरुन प्रशांत दामलेंना नेटकऱ्याने सुनावलं, म्हणाले, “अहो दामले…”

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. त्यांचे एकत्र केलेले अनेक रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. ही नारकर जोडी सध्या झी मराठी वाहिनीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ऐश्वर्या नारकर या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. तर अविनाश नारकरही ‘३६ गुणी’ जोडी मालिकेत महत्त्वाचं पात्र साकारत आहेत. ऐश्वर्या या योगाफ्रिक असून नेहमीच त्या योगा करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात.

Tags: aishwarya narkaravinash narkarentertainmentmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Kokanhearted Girl On Malaika Arora

कोकण हार्टेड गर्लबरोबर मलायका अरोरा मराठीत बोलली अन्…; ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाल्या, "मेले जळतात आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.