बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल सनी लिओनी ही तिच्या अभिनय व सौंदऱ्यासाठी लोकप्रिय आहे. मात्र अभिनय व मॉडेलिंगशिवाय ती तिच्या सामाजिक बांधिलकीसाठी देखील तितकीच ओळखली जाते. हेच सामाजिक भान जपत तिने आजवर अनेक सामाजिक संस्था आणि गरजूंना मदत केल्याचे दिसून आले आहे. नुकतीच सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Sunny Leone Offered Reward For Girl)
सनीने नुकताच एका लहान मुलीचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर तिचे नाव, पालकांची माहिती, घरचा पत्ता आणि फोन नंबर अशी सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने असे म्हटले आहे की, “ही माझ्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. ही मुंबईमधील जोगेश्वरी पश्चिम, बेहराम बाग येथून ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहे. तिचे आईवडील तिला शोधत आहेत तर कृपया तिचा काही संपर्क झाल्यास तिच्या आईशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल.”
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनियाच्या वडिलांचे निधन, भावुक होत म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील…”
ही पोस्ट शेअर करत सनीने मुंबई पोलीस, महानगरपालिका व महिला मंगल यांना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. तसेच ही मुलगी सुखरूप तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम ११,००० रुपये बक्षीस देण्याचं तिने घोषित केलं आहे. मात्र सनीने तिच्याकडून वैयक्तिकरित्या अतिरिक्त ५०,००० रुपये देखील देणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘जवान’ फेम अभिनेत्री नयनतारा संतापली, शाहरुख खान व दीपिका पदुकोणलाच सगळं श्रेय मिळाल्याने घेतला मोठा निर्णय
दरम्यान, सनीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि या पोस्टखाली अनेकांनी अनुष्का घरी सुखरूप येण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सनीच्या या स्वभावाबद्दल अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे.