प्रियांका चोप्रा सध्या परदेशात तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. निक जोनससह त्याच्या कुटुंबियांबरोबर प्रियांकाचं असलेलं गोड नातं सगळ्यांनीच पाहिलं. जोनस कुटुंबियांमध्ये ती अगदी खूश आहे. निकच्या भावांबरोबरही प्रियांकाचे बरेच व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण आता जोनस कुटुंबियांमधील एक कपल विशेष चर्चेत आलं आहे. निकचा भाऊ जो जोनस व त्याची पत्नी सॉफी टर्नर विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
जो व सॉफीच्या नात्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दोघांच्या नात्यामध्ये कटुता असल्यामुळे जो व सॉफीने घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. दोघांच्याही जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, जो व सोफी घटस्फोटाबाबत एलएमध्ये वकीलाबरोबर चर्चा करत आहेत.
आणखी वाचा – सुनील बर्वेचं गोरेगावमध्ये आहे मिठाईचं दुकान, दोन वर्ष करत आहे व्यवसाय, म्हणाला, “दुकानात काम करणाऱ्यांचे…”
गेल्या सहा महिन्यांपासून जो व सॉफीमध्ये मतभेद सुरु आहेत. परदेशात या जोडीला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळाली. मात्र जो व सोफीच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. २०१६मध्ये जो व सोफी यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर २०१७मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला.
२०१९मध्ये जो व सोफीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. लास वेगासमध्ये त्यांचं लग्न झालं. जो व सोफीला दोन मुलंही आहेत. सध्या जो व सोफी त्यांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. म्युझिक टूरमध्ये जो व्यग्र आहे. तर सोफी शो व चित्रपटांसाठी मेहनत घेत आहे.