मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेत्याच्या अश्लील मॅसेज प्रकरणी प्राची पिसाटचा युटर्न?, नेटकरीही संभ्रमात, म्हणाली, “चुकीचे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy

ज्येष्ठ अभिनेत्याच्या अश्लील मॅसेज प्रकरणी प्राची पिसाटचा युटर्न?, नेटकरीही संभ्रमात, म्हणाली, "चुकीचे…"

Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy : सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री प्राची पिसाटचा मुद्दा चर्चेत आला आहे. ज्येष्ठ अभिनेते सुशील म्हशीलकर यांनी प्राचीला आक्षेपार्ह मॅसेज करत वाईट वागणूक केल्याप्रकरणी प्राचीने आवाज उठविला. यावेळी प्राचीच्या धाडसाचं सिनेसृष्टीतून भरभरुन कौतुक करण्यात आलं. दरम्यान, अनेक चाहते मंडळींनीही प्राचीची बाजू उचलून धरत तिला पाठिंबा दिला. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनीं तर प्राचीसाठी खास पोस्ट शेअर केली आणि प्राचीने त्यांचे आभार मानत ही पोस्ट स्टोरीमध्ये रिपोस्टही केली. एकूणच प्राचीला भरभरुन पाठिंबा मिळत असताना प्राचीने केलेल्या एका कृतीने अनेकांना संभ्रमात पाडलं आहे. प्राचीच्या नव्या पोस्टमुळे तिनं या प्रकरणातून युटर्न घेतला असल्याचं बोललं जात आहे.

अभिनेते सुदेश म्हशीलकर (Sudesh Mhashilkar) यांनी ‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असा मॅसेज प्राचीला केला. प्राचीनं हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याचा चेहरा सर्वांसमोर आणला. मात्र याचवेळी तिने अभिनेत्यावर अनेक आरोपही केले. पण, आता मात्र, प्राची पिसाटच्या नव्या पोस्टमुळे गोंधळ उडाला आहे. प्राचीने एक स्टोरी पोस्ट करत तिने अभिनेत्यावर आरोप केले नसल्याचं म्हटलं आहे. प्राचीची ही पोस्ट अनेकांना गोंधळवून सोडणारी आहे.

आणखी वाचा – पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, “आजचा प्रवास…”

प्राचीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असं म्हटलं की, “डिअर मिडिया चॅनेल्स आणि अकाऊंट्स तुमचे खूप आभार. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि दयाळूपणासाठी मी तुमची आभारी आहे. कृपया तुम्ही याची नोंद घ्या की, मी आरोप वगैरे काही केलेले नाहीत. फक्त रिल्पाय आणि स्क्रीनशॉट शेअर केला आहे. विनंती आहे की, कृपया चुकीचे शब्द वापरु नका. तुम्ही सगळे अद्भूत आहात. फक्त विनंती आहे. तुम्ही मिसलीड न करता सपोर्ट कराल, याची मला आशा आहे”.

आणखी वाचा – वैष्णवीचे नको ते चॅट हाती, चारित्र्यावर शंका आणि…; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद, नेमकं सत्य काय?

याशिवाय प्राचीने स्टोरीमध्ये आणखी पोस्ट शेअर करत अद्यापही सुशील यांनी माफी मागितली नसल्याचं म्हटलं आहे. “आज पाचवा दिवस आहे तरी माफी नाही”, असं म्हणत तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्राचीने पोस्टद्वारे तिने आरोप नाही खुलासा केला असल्याचं म्हटलं आहे. ज्याने तिला नेमकं काय म्हणायचं आहे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी प्राचीची ही पोस्ट पाहता तिने या प्रकरणात युटर्न घेतला असल्याचं म्हटलं आहे.

Tags: entertainmentPrachi Pisat controversytrending news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
rono mukherjee passes away

राणी मुखर्जी व काजोलवर दुःखाचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन, बॉलिवूडही हळहळलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.