रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून चित्रपट विश्वातही पदार्पण केले. स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना जवळपास दोन वर्षे लागली आणि त्यांना आरोग्यापासून ते आर्थिक समस्यांपर्यंत आलेल्या अडचणींना तोंड द्यावे लागले. हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला आपली संपत्ती विकावी लागली आणि त्याने सर्वस्व पणाला लावल्याचे अभिनेत्याने एका पॉडकास्टमध्ये खुलेपणाने सांगितले. (Randeep Hooda Sold Properties)
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही याचे दुःख आहे. ‘बिअरबिसेप्स’ पॉडकास्टवर बोलताना रणदीपने आपली व्यथा मांडली आणि दोन वर्षांचा हा चित्रपट बनवताना त्याला काय सहन करावे लागले हे सांगितले. रणदीप म्हणाला, “मला त्याचे संपूर्ण आयुष्य २ तास ५० मिनिटांत दाखवायचे होते आणि एकही रंग सुटणार नाही याची काळजी घ्यायची होती. चित्रपट बनवताना आर्थिक समस्या होती. माझ्या वडिलांनी पैसे वाचवले होते आणि मुंबईत माझ्यासाठी काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या आणि त्याचमुळे हा चित्रपट पूर्ण केला. मी या चित्रपटासाठी सर्व काही खर्च केले. मात्र या चित्रपटाला पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही”.
हा चित्रपट बनवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, सुरुवातीला हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार होता आणि त्यानंतर २६ जानेवारीला तो रिलीज होणार होता, पण नंतर प्रॉडक्शनच्या अडचणींमुळे तारखा पुढे ढकलल्या गेल्या. मी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही. त्याच्याशी संबंधित टीमला या दर्जाचा चित्रपट बनवायचा नव्हता. त्याला फक्त चित्रपट बनवायचा होता. मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून रुजू झालो तेव्हा कामाचा दर्जा चांगला नव्हता आणि त्यानंतर चित्रपट निर्मितीत खूप अडचणी आल्या”.
या चित्रपटात रणदीपचे हुड्डाचे परिवर्तन पाहायला मिळाले आहे. रणदीपने सांगितले की, “यासाठी त्याने कठोर आहाराचे पालन करून अनेक किलो वजन कमी केले आणि त्याचे वजन ६० किलो केले. खरा संघर्ष चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सुरू झाला जेव्हा त्याला वजन राखायचे होते. तेव्हा नीट जेवण न केल्याने तो पाण्यावर जगू लागला”. सुरुवातीला तो ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी वगैरे घेत असे. यानंतर त्याच्या जेवणात चिला, डार्क चॉकलेट आणि बदाम यांचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारच्या जेवणामुळे त्याला झोपायला त्रास होऊ लागला. सेटवर तो अनेकवेळा अशक्तपणामुळे तो खाली कोसळला.