गायिका कार्तिकी गायकवाडने काल (२९ मार्च) रोजी सोशल मीडियावर ओटी भरणाचे काही खास फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली. लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी आई होणार असून नुकतेच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या गाण्याच्या शोमधून कार्तिकी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
आपल्या गाण्याने कायमच चर्चेत असणारी कार्तिकी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे खास फोटो शेअर करत असते आणि सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट्सही देत असते. अशातच तिने काल तिच्या ओटीभरणाच्या फोटोमुळे गायिका पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली. कार्तिकीच्या या ओटीभरणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोखाली तिला मराठीतील कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.
अशातच आता कार्तिकीच्या नवऱ्यानेही तिचे कालच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले आहेत. “कोणीतरी येत आहे आणि आम्ही त्याच्या आगमनाची तयारी करत आहे” असं म्हणत रोनित पिसेने कार्तिकीबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी रोनित कार्तिकीची चांगलीच काळजी घेताना दिसला. स्टेजवर चढताना रोनितने कार्तिकीचा हात धरत तिला आधार दिल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये रोनितचे आई-वडील, कार्तिकीचे आई-वडील त्याचबरोबर कार्तिकीचे भाऊही दिसत आहेत.
ओटी भरणाच्या या खास कार्यक्रमात कार्तिकी व तिचा नवरा रोहित पारंपरिक लूकमध्ये दिसले. कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती, तर रोहितने पांढऱ्या रंगाची पठाणी शेरवानी परिधान केली होती. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिनेही घातले होते. दरम्यान, कार्तिकीने रोनित पिसेबरोबर २०२० मध्ये विवाहगाठ बांधली होती. त्यांच्या या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. त्यामुळे कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.