नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि अजूनही हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पात्र ठरत आहे. अशातच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे काही आकडे समोर आले आहेत. (Animal Movie Box Office Collection)
१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून व प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘अॅनिमल’चे पहिल्या दिवसाचे जागतिक कलेक्शन हे ११६ कोटी रुपये इतके होते. तसेच आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. शनिवारी या चित्रपटाने ६६.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्याचबरोबर रविवारी म्हणजे प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी ७१.४६ कोटींची भरघोस कमाई केली.‘अॅनिमल’चे चार दिवसांचे एकूण कलेक्शन २१४.३७ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात होते. अशातच आता या चित्रपटाचे आठ दिवसांचे जागतिक कलेक्शन समोर आले आहे.
‘अॅनिमल’ने सलग आठव्या दिवशी जगभरात एकूण ६०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ६००.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या भरघोस कमाईमुळे ‘अॅनिमल’ने ५८७ कोटींची कमाई करणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. त्यामुळे ‘अॅनिमल’ या चित्रपटाने ‘ब्रह्मास्त्र’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘सिम्बा’ सारख्या अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ‘अॅनिमल’ हा जागतिक कलेक्शनमध्ये अजूनतरी ‘गदर २’, ‘पठाण’, ‘जवान’ व ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांच्या मागे आहे. ‘गदर २’चे जगभरातील कलेक्शन सुमारे ६९० कोटी रुपये होते. त्याचबरोबर ‘पठाण’, ‘जवान’ व ‘दंगल’ या चित्रपटांनी जगभरात १००० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.
आणखी वाचा – “महाराष्ट्र अजून चिखलात जात आहे आणि…”, सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “प्रभू श्रीराम असल्यासारखं…”
दरम्यान, ‘अॅनिमल’ या चित्रपटाची लोकप्रियता व क्रेझ पाहता हा चित्रपट लवकरच ‘गदर २’ पठाण व ‘दंगल’ सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची लोकप्रियता व मागणी वाढल्याने पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत चित्रपटाचे शोज लागले आहेत आणि हे सगळे शोज हाऊसफूल आहेत.