लहान पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत. कोरोंनाच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यावेळी पुन्हा एकदा सर्वांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेतील सर्व पात्रांची ओळख नव्याने झाली होती. अशातच आता या मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलची चर्चा आता त्यांच्या अभिनयाने नाही तर लोकसभेच्या मिळालेल्या टिकीटामुळे होत आहे. (Sunil Lahari on arun govil )
अरुण यतान भाजपकडून मेरठमधून निवडणूक मिळवण्याची संधी मिळाली आहे. यासाठी ते आता मेरठमध्ये पोहोचले आहेत. त्याबद्दल त्यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले की, “मेरठच्या जनतेला माझ्याकडून खूप प्रेम द्यायला आलो आहे. मेरठमधील सर्व आठवणी माझ्या नजरेसमोरून जात आहेत. येथे असलेले सर्व रस्ते,शाळा,घर सगळ्यांचीच खूप आठवण येत आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मेरठ हे त्यांचे गांव आहे. जे काम मी आधी करत होतो ते काम मी आताही करेन फक्त त्याचे आता रूप बदललेलं असेल”. दरम्यान अरुण यांनी कंगना रणौतवर केलेल्या विधानावर त्यांनी मौन साधले आहे.
दरम्यान ‘रामायण’ मालिकेतील ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी अरुण यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मी त्यांच्यासाठी खूप खुश आहे. कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असं वाटत आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांना संधी दिली आहे तर त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. मला खात्री आहे की ते याला न्याय देतील. त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे राम आहे”.
अरुण यांनी सुरवातीचे शिक्षण मेरठ येथील सरस्वती शिशु मंदिर, पूर्वा महावीर व राजकीय इंटर कॉलेजमध्ये तसेच सहारनपुर व शहाजहांपुर येथेही त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी आपले उच्च शिक्षण चौधरी चरण सिंह विश्वविद्यालयात झाले असून त्यांनी इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.