शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांच्यामध्येच कुठे ना कुठे राम आहे”, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “त्यांना खूप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 27, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunil Lahari on arun govil

“त्यांच्यामध्येच कुठे ना कुठे राम आहे”, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “त्यांना खूप...”

लहान पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत. कोरोंनाच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यावेळी पुन्हा एकदा सर्वांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेतील सर्व पात्रांची ओळख नव्याने झाली होती. अशातच आता या मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलची चर्चा आता त्यांच्या अभिनयाने नाही तर लोकसभेच्या मिळालेल्या टिकीटामुळे होत आहे.  (Sunil Lahari on arun govil )

अरुण यतान भाजपकडून मेरठमधून निवडणूक मिळवण्याची संधी मिळाली आहे. यासाठी ते आता मेरठमध्ये पोहोचले आहेत. त्याबद्दल त्यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले की, “मेरठच्या जनतेला माझ्याकडून खूप प्रेम द्यायला आलो आहे. मेरठमधील सर्व आठवणी माझ्या नजरेसमोरून जात आहेत. येथे असलेले सर्व रस्ते,शाळा,घर सगळ्यांचीच खूप आठवण येत आहे”.

आणखी वाचा – IPL मॅचदरम्यान मैदानात आला कुत्रा, सुरक्षारक्षकांनी मारली लाथ, वरुण धवन भडकला, म्हणाला, “फुटबॉल नाही की…”

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

पुढे ते म्हणाले की, “मेरठ हे त्यांचे गांव आहे. जे काम मी आधी करत होतो ते काम मी आताही करेन फक्त त्याचे आता रूप बदललेलं असेल”. दरम्यान अरुण यांनी कंगना रणौतवर केलेल्या विधानावर त्यांनी मौन साधले आहे.

आणखी वाचा – अस्सं सासर सुरेख बाई! सुनबाई घरी येताच सासूचा आनंद गगनात मावेना, तितीक्षा तावडेच सासरकडच्या मंडळींनी असं केलं स्वागत, सुंदर व्हिडीओ समोर

दरम्यान ‘रामायण’ मालिकेतील ‘लक्ष्मण’ची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी अरुण यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मी त्यांच्यासाठी खूप खुश आहे. कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असं वाटत आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांना संधी दिली आहे तर त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. मला खात्री आहे की ते याला न्याय देतील. त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे राम आहे”.

अरुण यांनी सुरवातीचे शिक्षण मेरठ येथील सरस्वती शिशु मंदिर, पूर्वा महावीर व राजकीय इंटर कॉलेजमध्ये तसेच सहारनपुर व शहाजहांपुर येथेही त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी आपले उच्च शिक्षण चौधरी चरण सिंह विश्वविद्यालयात झाले असून त्यांनी इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Tags: Arun Govilloksabhaloksabha electionramayan serialsunil lahari
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg boss 17 winner munawar faruqui detained by police from hookah bar in Mumbai released later

मुनव्वर फारुकीला मुंबई पोलिसांकडून अटक, हुक्का पार्लरवरील छापेमारीत पोलिसांची कारवाई, अटकेनंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.