यंदाच्या वर्षात मराठी कलाकारांच्या विवाह सोहळ्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. पूजा सावंत, शिवानी सुर्वे, अजिंक्य ननावरे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे यांसारख्या कलाकारांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. यात आणखी एक मराठमोळी आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ही लग्न बंधनात अडकली. ती अभिनेत्री म्हणजेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील तितीक्षा तावडे. (Titeeksha Tawde and Siddharth Bodke)
तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सिद्धार्थ व तितीक्षा यांनी डेस्टिनेशन वेडिंग करत त्यांचा विवाहसोहळा उरकला. सिद्धार्थ व तितीक्षाच्या लग्नातील तसेच लग्नापूर्वीच्या विधींचे म्हणजेच हळदी, संगीत, मेहंदी समारंभाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले. दोघांच्या लूकची ही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर आता तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्न सोहळ्यानंतरच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतल आहे.
एक लक्षवेधी व्हिडीओ तितीक्षाने तिच्या युट्युब चॅनेलवरुन पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ बोडकेंच्या घरी गृहप्रवेशादरम्यानचा आहे. सासरी गृहप्रवेशादरम्यानचा खूप सुंदर असा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला असून प्रेक्षक या व्हिडीओला पसंती दर्शवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थची आई व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत असून सून घरी येणार असल्याने खूपच आनंदी असल्याचं दिसलं. दरम्यान तितीक्षाच्या सासरी गृहप्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आलेली ही पाहायला मिळाली. गृह्प्रवेशावेळी दोघेही नववधूवर थिरकतानाही दिसले. तर अभिनेत्रीने गृहप्रवेशदरम्यान घेतलेल्या उखाण्याने ही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
“हळद झाली, लग्न झालं, आताच झाली वरात, सिद्धार्थच म्हणालाय तू अशी जवळी रहा, आता येऊ का घरात” असा लाजत घेतलेला उखाणा साऱ्यांच्या पसंतीस पडला. लक्ष्मीच्या पावलांनी तितीक्षाने बोडकेंच्या घरी गृहप्रवेश केलेला हा व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तितीक्षा व सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या संसारात रमलेले पाहायला मिळले. दोघांनीही लग्नानंतर कोणताही ब्रेक न घेता कामालाही सुरुवात केलेली पाहायला मिळाली.