शनिवार, ऑगस्ट 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mother’s Day निमित्ताने अर्जुन व अमोलने अप्पीसाठी बनवलं स्पेशल ग्रिटींग, अर्जुनचं प्रेम अप्पीपर्यंत पोहोचणार का?

Saurabh Moreby Saurabh More
मे 19, 2024 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector serial update Mother's Day Special Promo out.

Mother’s Day निमित्ताने अर्जुन व अमोलने अप्पीसाठी बनवलं स्पेशल ग्रिटींग, अर्जुनचं प्रेम अप्पीपर्यंत पोहोचणार का?

उद्या सर्वत्र ‘मदर्स डे’ म्हणजेच ‘मातृदिन’ साजरा केला जाणार आहे. यंदा १२ मे रोजी सर्वत्र ‘मदर्स डे’ साजरा केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आईसाठी हा दिवस खास करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी मालिकांमध्येही उद्याचा ‘मदर्स डे’ साजरा करण्यात येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतही ‘मदर्स डे’ साजरा करण्यात येणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतल्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्रीही झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून हास्यजत्रा सोडली?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर गौरव मोरेचं उत्तर, म्हणाला, “मुद्दा प्रोजेक्टचा नाहीतर…”

अशातच या मालिकेचा ‘मदर्स डे’ स्पेशल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यामध्ये अमोल व अर्जुन मिळून अप्पीसाठी खास ग्रिटींग कार्ड बनवतानाचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अर्जुन अमोलला “आपण तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट तयार करु” असं म्हणतो. यानंतर दोघे मिळून “माझ्या सर्वोत्कृष्ट आईसाठी खास भेट” लिहिलेलं छान ग्रिटींग कार्ड तयार करतात. हे ग्रिटींग पाहून अप्पीही खुश होत असल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात पुन्हा येत का नाही?”, चाहत्याच्या प्रश्नावर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं उत्तर, म्हणाला, “आयुष्यात सतत नवीन…”  

दरम्यान, या व्हिडीओला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अर्जुन व अमोल यांनी बनवलेले हे छान गिफ्ट अप्पीला आवडणार का? अप्पीला कळेल का की हे गिफ्ट अर्जुननेच बनवलं आहे? किंवा अप्पी व अर्जुन अमोलमुळे एकत्र येणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

 
Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
Next Post
Famous Marathi actor Siddharth Chandekar talked about he is jealous on her wife and friends.

‘या’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला वाटते त्याच्या बायको व मित्रांबद्दल Jealousy, स्वत:च केला खुलासा, म्हणाला, “हो मी जळतो आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.