शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला भरून आलं”, शिखर धवनला अक्षय कुमारने दिला आधार, म्हणाला, “मुलांना भेटता न येण्याइतकं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kumar On Shikhar Dhawan

"मला भरून आलं", शिखर धवनला अक्षय कुमारने दिला आधार, म्हणाला, "मुलांना भेटता न येण्याइतकं…"

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शिखर धवन मैदानावर खेळताना खंबीर आहे तसा तो त्याच्या खऱ्या आयुष्यात नाही. त्याचं वैयक्तिक आयुष्य सध्या सुरळीत नसल्याने तो डगमगलेला पाहायला मिळत आहे. पत्नी आयेशा मुखर्जीपासून विभक्त झाल्यामुळे धवन गेल्या एक वर्षापासून आपला मुलगा झोरावरला प्रत्यक्ष भेटू शकला नाही. लेकाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्ट शेअर करत धवनने असा दावा केला की, त्याच्या पत्नीने त्याला सर्व व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केले आहे ज्यामुळे तो त्याच्या मुलाशी संपर्क साधू शकत नाही आहे. (Akshay Kumar On Shikhar Dhawan)

आणखी वाचा – ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार, डिझायनर लेहेंग्यामध्ये खुललं सौंदर्य, रिसेप्शन लूकचे फोटो समोर

इन्स्टाग्रामवर धवनने भावनिक पोस्ट शेअर करत असे लिहिले आहे की, “मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झाले आहे, आणि आता, जवळजवळ तीन महिन्यांपासून, मला सर्वत्र ब्लॉक केले गेले आहे. माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे संवाद साधत होतो. मला तुझा खूप अभिमान आहे. बाबा नेहमी तुझी आठवण काढत आहे आणि तुझ्यावर प्रेम करत आहे. तो नेहमी सकारात्मक असतो, देवाच्या कृपेने आपण पुन्हा भेटू यासाठी मी तुझी हसतमुखाने वाट पाहत आहे. खोडकर हो, पण विध्वंसक होऊ नकोस, प्रेम देणारा हो. नम्र, दयाळू, सहनशील व बलवान हो. तुला न पाहिल्यावरही, मी जवळजवळ दररोज तुझ्यासाठी संदेश लिहितो, तुझ्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारतो, मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात काय नवीन आहे ते शेअर करतो. लव्ह यू लोड्स झोरा” अशी भावुक पोस्ट शिखरने लेकाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय कसं जगू?”, ‘देवमाणूस’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाची आत्महत्या, म्हणाला, “व्यक्त नाही झालास अन्…”

शिखरची ही लेकासाठीची भावुक पोस्ट पाहून अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या पोस्टचा फोटो शेअर करत अक्षय कुमारनेही शिखरला धीर दिला आहे. अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “ही पोस्ट वाचून मला खूपच भरून आलं. एक वडील म्हणून मी हे पूर्णपणे समजू शकतो की आपल्या मुलांना भेटता किंवा बघता न येण्याइतकं दुःख कशाचंच नाही. शिखर तू धीर धर, तू तुझ्या मुलाला लवकरच भेटू शकशील यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत. देव भलं करो” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “आमच्याकडे अ‍ॅडव्हान्स द्यायला पैसे नव्हते तेव्हा…”, ‘झिम्मा २’मधील कलाकारांच्या मानधनाबाबत क्षिती जोगचा खुलासा, म्हणाली, “सर्व पणाला लावून…”

शिखर धवनची पत्नी आएशाने धवनला त्यांचा मुलगा झोरावर पासून लांब राहण्यास भाग पाडल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असे न्यायालयाने मान्य करत घटस्फोटाला परवानगी दिली होती. मात्र तरीही मुलाचा संपूर्ण ताबा धवनला देण्यात आलेला नाही. त्याऐवजी, धवनला मुलगा झोरावरला ठराविक कालावधीसाठी भेटण्याची तसेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून धवनला लेकाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले होते पण तीन महिन्यांपासून शिखरला सर्वत्र ब्लॉक केल्यामुळे त्याच्या मुलाबरोबरचा संपर्क तुटला आहे.

Tags: akshay kumarakshay kumar on shikhar dhawanentertainmentshikhar dhawanshikhar dhawan son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Spruha Joshi Shared Plans

दिसायला हॉट, श्रीमंत अन्…; स्पृहा जोशीने केला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सचा खुलासा, म्हणाली, "मी आणखी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.