शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सासूबाई शांत राहा आणि…”, अंकिता लोखंडेच्या सासूची वागणूक पाहून भडकली राखी सावंत, चांगलंच सुनावलं, म्हणाली, “कैकेयी नका होऊ कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2024 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"सासूबाई शांत राहा आणि...", अंकिता लोखंडेच्या सासूची वागणूक पाहून भडकली राखी सावंत, चांगलंच सुनावलं, म्हणाली, "कैकेयी नका होऊ कारण..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फॅमिली वीक विशेष चर्चेत राहिला. विकी जैनची आई व अंकिता लोखंडेची सासू ‘बिग बॉस’च्या घरात या फॅमिली वीकदरम्यान आल्यानंतर विशेष चर्चा रंगली. यावेळी अंकिताच्या सासूबाईंनी अंकिताला बोल लगावले, त्यानंतर सर्वांनी रंजना जैन यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. रश्मी देसाईपासून ऐश्वर्या शर्मापर्यंत तसेच इतर कलाकारांनी अंकिताला साथ दिली. अशातच आता राखी सावंतनेही एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमधून राखीने अंकिताच्या सासूला खायला प्यायला सांगत मजा करायला सांगितलं आहे. शिवाय कैकेयी होऊ नको असा सल्ला दिला आहे.

राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस १७’ ची विजेती म्हणून घोषित केले. तसेच तिच्या सासूबाईंना चार गोष्टी सांगितल्या. व्हिडीओमध्ये राखी सावंत असं म्हणत आहे की, “हॅलो फ्रेंड्स, मला अंकिताच्या सासूला सांगायचे आहे की, सासूही एकदा सून होती. पती-पत्नीमध्ये तुम्ही का येताय? एकदा तुमच्या मुलाने तुमच्या सूनेचा हात धरून लग्न केले, मग तुम्ही त्यांच्या भांडणात का पडत आहात? सासूबाई शांत राहा. खा-प्या, मजा करा” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “त्यांचं नातं खराब…”, अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यावर उषा नाडकर्णींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, “अधिक समस्या…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत पुढे म्हणाली, “अंकिता ही ट्रॉफी काही करुन जिंकणार आहे. अंकिता ‘बिग बॉस’ जिंकणार आहे. आणि हा माझा अंदाज आहे. राखी सावंतचा अंदाज. आमची मराठी मुलगी अंकिता जिंकणार आहे. मग तुम्हाला खूप आनंद होईल की माझी सून जिंकली, माझी सून जिंकली. अहो अंकिताच्या सासूबाई, असं करू नका. शांतपणे बसा. तुमचा मुलगा व सून यांच्यात बोलू नका. सूनेचा आदर करा. मग तुमच्या मुलीचाही सन्मान होईल” असंही ती म्हणाली.

आणखी वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”

राखी सावंत पुढे रंजना जैन यांना म्हणाली, “अंकिता माझी बहीण आहे. मी घरी आले तेव्हा आपली भेट झाली होती. तेव्हा तुम्ही तर मला देवासमान वाटल्या होता. मग आता असं अचानक काय झालं? आई, कैकेयी होऊ नका. घर वाचवा. घर फोडू नका. आई, त्या दोघांचे घर तोडू नकोस. दोघांचं घर वाचव. मी आल्यावर भेटेन तुम्हाला. माझं डोकं फरवू नका. विकी जीजू खूप चांगला मुलगा आहे. चांगला नवरा आहे. त्याला प्रेमाने सांगा की त्याच्या पत्नीला आधार दे. हे ‘बिग बॉस’चं घर आहे. इथे वाद व मारामारी होतंच असतात. यात काय मोठं आहे. ती तुमची सून आहे. सून नाही तर ती तुमची मुलगी आहे. आई तिला प्रेमाने वागवा” असंही तिने म्हटलं आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainankita lokhande mother in lawbigg bossbigg boss 17rakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Vicky jain regrets he did not treated his wife ankita lokhande politely see the details

Bigg Boss 17 : "माझ्या पत्नीशी…", बायकोला तुच्छ वागणूक दिल्यानंतर विकी जैनला समजली स्वतःची चूक, म्हणाला, "अधिक चांगलं वागणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.