राखी सावंत व आदिल खान दुर्रानीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. दोघंही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहे. राखी व आदिलने वेगळवेगळी पत्रकार परिषद घेत स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण या दोघांमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. आता आदिलने राखीवर गंभीर आरोप केले आहेत. राखी त्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं आदिलचं म्हणणं आहे. (Rakhi Sawant Adil Durrani Controversy)
आदिलने पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की, “राखीने तिच्याकडे जे काही पुरावे असतील ते कोर्टात सादर करावे. ती कोणत्याही गोष्टी अशाच बोलू शकत नाही किंवा गंभीर आरोप करु शकत नाही. मी म्हैसुरमध्ये एका गुन्हेगाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझा जीव धोक्यात आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यातही माझ्या जीवाला धोका असल्यामुळे तक्रार दाखल केली आहे”.
“राखीला माझा जीव घ्यायचा आहे. शैलीला हाताशी घेऊन तिने हे प्लॅनिंग केलं होतं. तिने शैलीला मला मारण्यासाठी सुपारी दिली आहे. म्हैसुर पोलिसांना मी याबाबत कल्पना दिली आहे”. आदिलने पोलिसांना राखीबाबत सगळं काही कळवलं आहे. शिवाय त्याने राखीबाबत काही खुलासे केले. राखी करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं आदिलचं म्हणणं आहे.
आदिल पुढे म्हणाला, “मला जर काही झालं किंवा माझा मृत्यू झाला तर यासाठी राखी सावंत व शैली लाठरला जबाबदार ठरवा. शैली एक सिरियल किलर आहे”. राखीनेही पत्रकार परिषद घेत आदिलवर काही आरोप केले. आदिलने दोन ते तीन वेळा लग्न केलं असल्याचं राखीने म्हटलं आहे. शिवाय तिलाही आदिलने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं तिचं म्हणणं आहे.