‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल येणार ही बातमी कळाल्यापासून सर्वत्र ‘गदर २’ ची चर्चा रंगली होती. बरं चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटातील कलाकारांनी ही उत्तम काम केलं. सनी देओल व अमीषा पटेल यांची जोडी मोठया पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींहून अधिक कमाई केली. (Ameesha Patel Replied To Trollers)
चित्रपट प्रेक्षकांना आवडला असला तरी सकीना आणि तारा सिंग यांना खूप कमी स्क्रीन टाइम असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शिवली. ‘गदर २’ चित्रपटामुळे अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली. दरम्यान ‘गदर ३’मध्ये कमी रोल असेल तर तो चित्रपट करणार नाही, असं वक्तव्य अमीषा पटेलने केलं होतं. तर आता त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
पण आता अशातच अमीषा पटेलला प्रेक्षकांनी वयावरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या नेटकऱ्यांना अमीषाने सडेतोड उत्तर दिलं आहे. अमीषाच्या या चित्रपटातील भूमिकेवर काही जणांनी टीका केली. या चित्रपटामध्ये सकीनाची भूमिका साकारणारी अमीषा खूपच म्हातारी वाटत असल्याचंही म्हटलं गेलं. यावर उत्तर देत अमीषाने म्हटलं, “सनी देओलचं वय ६५ असलं तर तुम्हाला चालतं, पण मला मात्र म्हातारी म्हणायचं तर हे काही बरोबर नाही. नेटकरी नेहमीच मला वयावरुन बोलतात.”
पुढे ती म्हणाली, ”मला त्यांना सांगायचं आहे की, वय हा नेहमीच एक आकडा राहिला आहे. माझं वय जरी हे पन्नाशीच्या जवळ असलं तरी मी अजूनही २० वर्षाच्या एखाद्या अभिनेत्री प्रमाणे काम करते हे लक्षात घ्या. लोकं बोलताना काहीही विचार करत नाहीत. तुम्हाला अभिनेत्याचं वय जास्त असलं तरी चालतं, पण अभिनेत्रीच्या वयाबद्दल तुम्ही फारच विचार करता.”