शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 3:54 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Rajinikanth starrer Lal Salaam will soon be released on OTT see the details

बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

९ फेब्रुवारी रोजी रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘लाल सलाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने दिग्दर्शनात कमबॅक केलं. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित ‘लाल सलाम’ चित्रपटगृहात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका असूनही या चित्रपटाने ११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर केवळ १६.३४ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली आहे.

लाल सलाम हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असला तरी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने समाजात हिंदू-मुस्लीम यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे या चित्रपटातून दिसून येते. या चित्रपटातून धार्मिक सलोख्याचे महत्त्व खेळातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली असली तरी बॉक्स ऑफिसवर तो प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला.

View this post on Instagram

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना शेठच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “खूप दुःख…”

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी पाहता याचे डिजिटल अधिकार कुणीच विकत घ्यायला तयार नव्हते. पण आता ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर ‘सन टीव्ही’ने सॅटेलाइट हक्क विकत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज, बिकट अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये भरती, मरण नको म्हणत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी…”

दरम्यान, पुढील महिन्यात मार्चमध्ये ‘लाल सलाम’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘लाल सलाम’ पुढील आठवड्यापर्यंत चित्रपटगृहांमधून काढून टाकण्याची शक्यता आहे. अशातच मार्चच्या पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Tags: entertainment newslal salaammoviesott entertainment newsOTT Movie Newsott newsrajinikanthओटीटी चित्रपट बातमीओटीटी बातमीओटीटी मनोरंजन बातमीचित्रपटमनोरंजन बातमीरजनीकांतलाल सलाम
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Anushka and Virat new born baby

जन्मतःच सोशल मीडिया स्टार झाला विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा लेक, नेमकं काय घडलं?, लोकही आश्चर्यचकित अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.