Sonnalli Seygall Blessed With Baby Girl : ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सहगल सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने १६ ऑगस्ट रोजी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता अभिनेत्रीने आई झाली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. सोनालीच्या गरोदरपणातील फोटोशूटनेही साऱ्यांचे लक्ष वेधले होते. बेबी बंपचे फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली. यानंतर आता अभिनेत्री आई झाली असल्याची बातमी समोर आली आहे.
सोनाली सहगलने काल संध्याकाळी म्हणजेच २७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका मुलीला जन्म दिला. सोनाली अजूनही मुंबईतील रुग्णालयात दाखल आहे. सूत्रानुसार, मुलगी आणि आई दोघींची प्रकृती ठीक आहे. सोनाली व आशिष आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदी असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना एका खास पद्धतीने सांगितली होती. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्रीने गरोदरपणाची गुडन्यूज दिली.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर बोट दाखवणाऱ्यांना तिच्या वहिनीने दिलं उत्तर, म्हणाली, “कोणाचेही नाव घेऊन…”
गरोदरपणाची घोषणा करताना सोनालीने कॅप्शन देत असे म्हटले होते की, “बिअरच्या बाटल्यांपासून बाळाच्या बाटल्यांपर्यंत आशिषचे आयुष्य बदलणार आहे. जोपर्यंत माझा संबंध आहे, काही गोष्टी तशाच राहतात. पूर्वी मी एकटीसाठी खात होतो, आता मी दोघांसाठी खात आहे. दरम्यान, समशेर (सोनालीचा कुत्रा) चांगला मोठा भाऊ होण्यासाठी नोट्स काढत आहे. धन्य आहे आणि खूप आनंद झाला. कृपया प्रार्थना करा”. अभिनेत्रीने असेही सांगितले की, ती येत्या डिसेंबरमध्ये आई होईल. मात्र नोव्हेंबर महिन्यातच तिने चिमुकलीला जन्म दिला आहे.
आणखी वाचा – मलायका अरोराने लेकाबरोबर सुरु केला नवा व्यवसाय, सारख्याच लूकमध्ये दिसताच चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल
आशिष व सोनालीचे गेल्या वर्षी ७ जून २०२३ रोजी गुरुद्वारामध्ये लग्न झाले होते. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांनीच हजेरी लावली होती. सोनाली व आशिष लग्नाआधी पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘प्यार का पंचनामा’ सहकलाकार कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांनीही सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली होती.