बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. अर्जुन कपूरबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरु आहे. मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत राहिली आहे. अनेकदा ती तिच्या मुलाबरोबरही फिरताना दिसून येते. अरहानबरोबर ती वेळ घालवताना दिसते. अशातच आता पुन्हा एकदा मलायका व अरहान दोघंही एकत्रित स्पॉट झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ तसेच फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहेत. मात्र आता जो व्हिडीओ समोर आला त्यामध्ये माय-लेकाचा खास लूक बघायला मिळाला आहे. यामुळे आता नक्की काय सुरु आहे याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. (malaika arora with son video)
मलायका व अरहानचा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहे. यामध्ये दोघांचा एकसारखा लूक बघायला मिळत आहे. दोघांनी काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे माय-लेक अजिबात वाटत नाहीत”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की “दोघंही खूप गोड दिसत आहेत”.
नंतर एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “कमाल आहे. या वयातदेखील मलायका लेकाच्या वयाची दिसत आहे”. दरम्यान सध्या मायलेक नवीन काहीतरी करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून मुंबईमध्ये एक नवीन हॉटेल सुरु केले आहे. एका मुलाखतीदरम्यान मलायकाने अरहान रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते.
दरम्यान आता रेस्टॉरंटच्या प्रोजेक्टमध्ये त्याचे काही मित्रदेखील समाविष्ट आहेत. अरहानने काही दिवसांपूर्वी स्वतःचा पॉडकास्टदेखील सुरु केला आहे. यामध्ये तो त्याच्या कुटुंबातील लोकांच्या आयुष्याशी निगडीत काही किस्से सांगतो. तसेच भविष्यातील इतर प्लॅनची चर्चादेखील करताना दिसतो. या पॉडकास्टमध्ये त्याची आई म्हणजे मलायकादेखील पोहोचली होती. यावेळी अरहानने तिच्या अफेअर आणि लग्नाबद्दल चर्चा केली होती. दरम्यान मलायका अर्जुन कपूरपासून वेगळी झाली आहे. अर्जुनने एका इव्हेंटमध्ये तो सिंगल असण्यावर शिक्कामोर्तब केला होता. त्यामुळे आता मलायका सिंगल आयुष्य जगत आहे आणि स्वतःकडे लक्षदेखील देत आहे.