प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘मधुबाला’ या मालिकेतून अभिनेत्री दृष्टी धामी सध्या खूप चर्चेत आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर तिच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. गरोदरपणाच्या १० व्या महिन्यात प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. “ती आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४. स्वर्गातून थेट आमच्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात”, असे कॅप्शन देत तिने लेकीच्या जन्माची गुडन्यूज देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छादेखील दिल्या होत्या. (drashti dhami daughter name)
त्यानंतर दिवाळीमध्ये तिने मुलीचा पहिला फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या फोटोमध्ये तिने बाळाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. अशातच आता तिने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे. दृष्टीने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे पाय व आई-बाबा दोघांचे हात दिसून येत आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “लीलाला सगळ्यांनी हॅलो म्हणा”. असे लिहीत तिने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.
मुलीच्या नावाची घोषणा करताच नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हे नाव सुंदर असल्याही म्हटले आहे. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दृष्टीने १४ जून रोजी गरोदर असल्याची घोषणा केली होती. नीरज व दृष्टी यांनी २०१५ साली लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या नऊ वर्षानंतर आई होणार असल्याने ती खूपच आनंदी होती.
दृष्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दुरंगा’ या वेबसीरिजमध्ये शेवटची दिसून आली होती. याआधी ती विवियन डिसेनाबरोबर ‘मधुबाला’ या मालिकेत दिसून आली. तसेच ‘सिलसिला- बदलते रिश्तो का’, ‘गीत हुई सबसे पराई’, एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस मे है मेरा दिल’ या मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली आहे.