Shrima Rai On Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. सध्या ऐश्वर्या आणि तिची मेहुणी श्वेता नंदा यांच्यातील कटु नातेसंबंधाने अफवांमध्ये वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. अलीकडेच अशी बातमी पसरली की, ऐश्वर्याने तिची वहिनी श्रीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. या बातम्या खोट्या ठरवत ऐश्वर्याने तिची वहिनी श्रीमाला तिच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ पाठवला असल्याचं समोर आलं. श्रीमाने त्याचा फोटो शेअर करत आणि आभारही मानलेले दिसले. दरम्यान, श्रीमाने तिची मेहुणी ऐश्वर्याबद्दल काहीही का पोस्ट केले नाही, अशी चर्चा सुरु झाली.
यावर आता श्रीमाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या अफवांबद्दल स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे, त्यानंतर तिला अशी आशा आहे की त्यांना या संदर्भात कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमधून अलीकडेच अभिनेत्रीची वहिनी श्रीमा राय हिचे नावही चर्चेत आले आहे. अलीकडेच श्वेता बच्चनच्या सोशल मीडिया पोस्टचीही बरीच चर्चा झाली होती. ज्यांनी श्रीमाच्या ऐश्वर्याबरोबरच्या नात्याकडे बोट दाखवलं होतं त्यांना श्रीमाने एक नवा संदेश दिला आहे.
आणखी वाचा – गावच्या जत्रेत अंकिता वालावलकरची नवऱ्यासह धमाल-मस्ती, खेळताना भांडलेही अन्…; व्हिडीओ व्हायरल

श्रीमा राय हिने या पोस्टमध्ये तिचे संपूर्ण विचार मांडले आहेत. तिने लिहिले आहे की, “माझा वाढदिवस २१ नोव्हेंबरला होता आणि नेहमीप्रमाणे मला पुष्पगुछ पाठवण्यात आला. मी त्यांचेही आभार मानले. ब्लॉगर/सामग्री निर्माता होण्यापूर्वी, मी बँकर होते. मी ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया ग्लोब २००९ देखील आहे. मी २०१७ नंतर ब्लॉगिंग सुरु केले, मी कोणाचेही नाव घेऊन कोणताही व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केलेला नाही”.
आणखी वाचा – मोठी बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
श्रीमा यांनी लिहिले, “मी हे लिहित आहे कारण ही वस्तुस्थिती आहे. मी अनेक वर्षांपासून एक सामग्री निर्माता म्हणून एक स्वतंत्र करिअर तयार केले आहे. एक स्त्री असल्याने या वस्तुस्थितीचा कोणी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला तर मला ते अजिबात आवडणार नाही. माझे पती, माझी सासू आणि माझे आई-वडीलही हे याची साक्ष देऊ शकतात. आई असल्याने माझ्या नावाची जिथे चर्चा होतेय तिथे स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे”.