मनोरंजन विश्वात खळबळ माजवणारा चित्रपट ठरला तो दाक्षिण्यात अभिनेता अल्लू अर्जुनाची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’. बॉक्स ऑफिस वर बक्कळ गल्ला जमवल्या नंतर या चित्रपटाचे दिगदर्शक, निर्माते चित्रपटाच्या पुढच्या भागाच्या शूटिंग कडे वळले. पण आता मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा २ या बहुचर्चित चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबवण्यात आल्याचं सांगितलं गेले आहे.(Pushpa 2 Shooting Stop)
अल्लू अजुर्नच्या जन्मदिवसानिम्मित पुष्पा २ चा टिझर देखील लाँच करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच ही मोठी अपडेट देण्यात आली आहे. रिपोर्ट्सच्या माहिती नुसार आता पर्यंत झालेले शूट प्रेक्षकांच्या पचनी पडणार नाही अशी शंका दिगदर्शकांना आहे. त्यामुळे कंन्टेन्ट वर काम करून पुन्हा एकदा शूट करणार असल्याचं बोललं जात आहे. तर २०२३ मध्ये रिलीज होणारा पुष्पा आता २०२४ मध्ये प्रदर्शित होणार का असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
हे देखील वाचा – माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या सीनची तुलना करणं नेटफ्लिक्सला पडलं महागात! बिग बँग थेअरी मधील ‘तो’ भाग डिलीट

पुष्पा या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज आणि अभिनेत्री रश्मिका मंधानाचा रोमँटिक लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. चित्रपट समीक्षकांच्या मते चित्रपटाचं कथानक सुद्धा बॉक्स ऑफीसा वर गल्ला जमवण्या इतकं दमदार नक्की होत. चित्रपटातील अनेक ठिकाणी केलेलं शूट, गाणी या सगळ्यांचीच प्रेकांच्या मनात घर केलं आहे. पुष्पा मधील सामी सामी हे गाणं आणि त्यावरील रश्मिका हुक स्टेप चांगलीच चर्चेत ठरली आहे. अनेक रील सुद्दा त्या गाण्यावर व्हायरल होताना दिसले.(Pushpa 2 Shooting Stop)
हे देखील वाचा – अजय देवगणच्या त्या आयकॉनिक एन्ट्रीने दिलेली अनिल कपूरच्या ‘लम्हे’ला टक्कर

रेकॉर्ड ब्रेक करणारा पुष्पा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस वर दमदार कामे करणार का? अल्लू अर्जुन सह आखि कोणता दाक्षिण्यात अभिनेता पुष्पा २ मध्ये दिसणार हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.