कधी कधी काही गोष्टी अनपेक्षित रित्या घडतात पण त्या त्याचा परिणाम अत्यंत सकारात्मक घडतो. असच काहीस घडलंय आपल्या बॉलीवूड मध्ये दिलजले म्हणून लोकप्रिय ठरलेला अभिनेता अजय देवगण. आज या आपल्या लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.बॉलीवूड मध्ये ऍक्शन दिगदर्शकांचं नाव जेव्हा घेतलं जात त्या व्यक्तींमध्ये एक नाव अगदी हक्कानं घेतलं जात ते म्हणजे दिगदर्शक वीरू देवगण. कोणत्याही पित्याच्या स्वप्नांप्रमाणे वीरू यांनीही अजयला चित्रपट सृष्टीत आणण्याचा घाट घातला.(Ajay Devgan Birthday)
हे देखील वाचा – दोघे बोहल्यावर चढणार होते मात्र या कारणामुळे अक्षय आणि शिल्पा यांच्यातील नातं तुटलं
फूल ओर कांटे या चित्रपटातून अजय ने रुपेरी पडद्यावर आगमन केले आणि त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने तरुणांच्या जगात एक चांगलंच वार संचरुन गेलं. पदार्पणाच्या पाहिल्याचं चित्रपटात अजय देवगण या नावाला फिल्मफेअर सारखा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. जेष्ठ पत्रकारांच्या माहिती नुसार या चित्रपटा यश चोप्रा यांचा लम्हे सुद्दा प्रदर्शित करण्यात आला होता पण अजय देवगण आणि अनिल कपूर या नावाच्या शर्यतीत अजय देवगण हे नाव भाव खाऊन गेलं आहे लम्हेला बाजूला सारून फूल ओर कांटे सुपरहिट ठरला.(Ajay Devgan Birthday)
अजय देवगण ने नंतर प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोबत लग्न केले. ही जोडी अनेक चित्रपटांमधून सुद्धा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अजय देवगण चित्रपटातील अनेक नावांमुळे प्रसिद्ध झाला बहुतांश चित्रपटांमध्ये अजय हे नाव सुद्दा शिताफीन वापरलेलं दिसत पण अजय या नावा आधी या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव होत विशाल देवगण तसेच अजयला घरात राजू म्हणून देखील हाक मारायचे. पुढे राजू चा विशाल आणि विशालचा अजय झाला आणि नावा प्रमाणे मनोरंजनविश्वात देखील अजयचं राहिला. गोलमाल, सिंघम यांसारख्या चित्रपटांमधून अजयला विनोदी असो किंवा ऍक्शन अजयला काहीही अश्यक्य नाही हे प्रेक्षकांना कळून चुकलं होत.
पुढे दिलजले ते सध्या चांगलाच चर्चेत असलेला भोला अभिनय ते दिगदर्शन, निर्माता अजय देवगणचा हा प्रवास कौतुकास्पद ठरला आहे.
हे देखील वाचा – ‘..म्हणून अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाशी धरला होता अबोला’