आई कुठे काय करते ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आली . मालिकेत अरुंधतीनं दुसरं लग्न करत आशुतोषसोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. पण तिच्या वरची संकटं काही संपत नाही. एकीकडे अरुंधतीचा सुखी संसार आहे तर दुसरीकडे ईशाने देखील आपल्या आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीपेक्षा आता तिच्या मुलांच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं आहे. तर अनिरुद्ध या सगळ्याला अरुंधतीला कारणीभूत ठरवलं आहे.पण ईशा अनिरुद्धला अनिशची माफी मागायला सांगतेय.मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये हे पाहायला मिळतंय..(isha anirudha)
आई कुठे काय करते या मालिकेत काही दिवसांपूर्वीच देशमुखांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. पण त्यानंतर पुन्हा घरात काळजीचं वातावरण निर्माण झालं. ईशाच्या वागण्यामुळे देशमुखांच्या घरात पुन्हा नवं वादळ येणार आहे. ईशाच्या त्या निर्णयामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचा नवीन अपडेट समोर आली आहे.त्यानुसार ईशा आणि अनिश एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण त्यांना वाटतंय कि आता घरातील सगळेच त्यांच्या नात्याला विरोध करतील.म्हणून ती स्वतःला खोलीत कोंडून घेते.पण पुढे ती अनिरुद्धला अनिशची माफी मागायला सांगते.
मालिकेच्या नव्या अपडेटनुसार, ईशा सगळ्यांवर चिडून स्वतःला रूममध्ये कोंडून घेते. सगळे तिला दार उघडण्याची विनवणी करतात पण ती कोणाचंच ऐकत नाही. तेव्हा अनिरुद्ध तिला उलट बोलत म्हणतो, ‘ईशा लवकर बाहेर ये नाहीतर मी तुला बाहेरून लॉक करेन’ अनिरुद्धच्या या बोलण्यावर अरुंधती चिडते. तर त्यानंतर अनिरुद्ध तिलाच उलट बोलतो. तो म्हणतो, ‘हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय अरुंधती.’त्यांनतर यश अनिशला कॉल करतो,त्याचा आवाज ऐकताच ईशा खोलीबाहेर येते ती सगळ्यांवर चिडते पण त्यांनतर ती माझी एक अट आहे. बाबा तुम्हाला आधी अनिशची माफी मागायला लागेल. त्याची चूक नसताना तुम्ही त्याला भर रस्त्यात मारलं..(isha anirudha )
ईशाच्या रूपाने अनिरुद्ध चकित झाला.तर आता अनिरुद्ध काय करेल? अरुंधती ईशाला समजावू शकेल का, ईशा आणि अनिषच्या लग्नासाठी देशमुख कुटुंब तयार होईल का? हे पाहणं उत्सुकतेचं असेल.