अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर १७ नोव्हेंबर रोजी पटणा येथील गांधी मैदानावर प्रदर्शित करण्यात आला. एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची झलक पाहण्यासाठी दोन लाखांहून अधिक लोक आले होते. मात्र जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहेत. ‘पुष्पा २ द रुल’च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी जमावाने चप्पल, विटा, दगड आणि बाटल्याही फेकल्या, ज्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले.
परिस्थिती इतकी बिकट झाली की, जमावाला रोखण्यासाठी बिहार विशेष सशस्त्र पोलिसांना पाचारण करावे लागले आणि अनेक बॅरिकेड्सही तोडण्यात आले. काही लोक वॉच टॉवरवरही चढले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना गांधी मैदानात पोहोचले तेव्हा गर्दी त्यांच्या मागे धावताना दिसली. ट्रेलर लाँचचे आमंत्रण संध्याकाळी ६:३० वाजता नियोजित होते, परंतु ते संध्याकाळी पाच वाजता सुरु झाले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय ‘पुष्पा २’चे इतर कलाकारही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आणखी वाचा – आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video
अल्लू अर्जुन जेव्हा पाटणा विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याने चाहत्यांसाठी त्याची ‘पुष्पा’ स्टाईल सिग्नेचर पोजही दिली. तो आणि रश्मिका मंदान्ना ताज हॉटेलमध्ये राहतात. ट्रेलर लॉन्चसाठी कडक सुरक्षा आणि व्यवस्था करण्यात आली होती. पाटणाचे डीएम आणि एसएसपीही गांधी मैदानावर उपस्थित होते. ‘पुष्पा २’ चित्रपटगृहात पाच डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात फहद फासिल, श्रीलीला, अनुसया भारद्वाज, सुनील आणि जगपती बाबू यांच्या भूमिका आहेत. ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून चाहते त्याला ‘वाइल्ड फायर’ म्हणत आहेत.
‘पुष्पा २’ मध्ये दमदार डायलॉगही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ट्रेलरच्या सुरवातीला, ‘कौन है ये आदमी, जरूर इसे कोई गेहरी चोट लगी है’ असं म्हटलं जातं. ‘पुष्पा ढाई अक्षर…नाम छोटा है लेकिन साउंड बहोत बडा है, पुष्पा मतलब ब्रँड’ असं म्हणत पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनची एन्ट्री होते. पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा आणि हटके अंदाज दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे.