बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाह सध्या खूप चर्चेत आहे. आजवर कश्मिरा अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. काही महिन्यांपूर्वी ती नणंद आरती सिंहच्या लग्नात धमाल करताना दिसून आली. यावेळी ती मुलांसमवेत व नवऱ्याबरोबर धमाल करताना दिसली. नुकतीच ती नवरा कृष्णा अभिषेकबरोबर कलर्स वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमामध्ये दिसून आली होती. यामध्ये दोघंही खूप धमाल करताना दिसून आली होती. आता कार्यक्रम संपल्यानंतर कश्मिरा कुटुंबासमवेत धमाल करताना दिसून आली. अशातच आता कश्मिराच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या बातमीमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. (kashmera shah accident)
कश्मिरा सध्या लॉस एंजलिसमध्ये आहे. तिच्याबरोबर तिचे दोन्ही मुलं रेयान व कृशांग धमाल करत होती. मात्र ७ नोव्हेंबर रोजी मुलं भारतात परतली. त्यावेळी सोशल मीडियावर संपूर्ण कुटुंबाचे अनेक रील्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळाले. अशातच आता कश्मिराची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. कश्मिराने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये कपड्याला रक्त लागलेले दिसून येत आहे.
तिने फोटो शेअर करत लिहिले की, “मला वाचवण्यासाठी देवाचे खूप आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणारच होतं. पण मी वाचले. जखमांचे डाग राहणार नाहीत अशी आशा. प्रत्येक दिवस आनंदाने जगा”.पुढे तिने लिहिले की, “पुन्हा भारतात परत येण्याची वाट बघत होतो. मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.”. यावेळी तिने नवऱ्याचं आणि तिच्या मुलांचीदेखील नावं लिहिली आहेत.
कश्मिराचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावर राजेश खट्टरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “अरे देवा, काय झालं कॅश?”, तसेच कृष्णाने लिहिले की, “देवाच्या कृपेने तू ठीक आहेस”, तसेच दिपशीखा नागपालने लिहिले की, “हे काय झालं”, दरम्यान कश्मिराचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.