हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. तेलंगणा पोलिसांनी रविवारी चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. थिएटरबाहेर झालेल्या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि याबद्दल अभिनेत्याला माहिती दिल्यानंतरही अल्लू अर्जुनने तिथून जाण्यास नकार दिला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेच्या नऊ वर्षांचा मुलगा जखमी झाला. (Pushpa 2 stampede case Police released CCTV footage)
याप्रकरणी अल्लू अर्जुनने शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू आपली मांडली. यावेळी त्याने “पोलिसांच्या सूचनेनुसारच मी तिथे गेलो आणि जर परवानगी नसेल आणि त्यांनी मला परत जाण्यास सांगितले असते” असं म्हटलं होतं. तसंच चेंगराचेंगरीविषयी कळताच तो संध्या थिएटरमधून लगेच बाहेर पडला असल्याचेही त्याने सांगितलं. मात्र आता पोलिसांनी याविरोधातील माहिती सांगितली आहे. रविवारी पोलिसांनी थिएटरमधील फुटेज जारी केले. यामध्ये अल्लू अर्जुन मध्यरात्रीपर्यंत थिएटरमध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. त्याने पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेलंगणा पोलिसांनी केला आहे.
BREAKING: I personally wrote a letter✍️🏻🗒️ stating that permission was NOT✖️ granted for the theater visit.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 22, 2024
We tried hard but could not save a life…I am very sad about that. By the grace of God, the boy who is undergoing treatment in the hospital should be treated.
I wrote a… pic.twitter.com/p7eq3ul7w5
चिक्कडपल्ली झोनचे एसीपी रमेश कुमार म्हणाले की, “थिएटर मॅनेजरने सुरुवातीला पोलिसांनी अल्लू अर्जुनजवळ जाण्याची परवानगी दिली नाही. पोलिसांचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असं त्यांना मॅनेजरकडून सांगण्यात आलं. तरीसुद्धा अल्लू अर्जुन तिथून निघाला नाही. अखेर आम्ही जेव्हा अल्लू अर्जुनजवळ पोहोचलो तेव्हा त्याला महिलेच्या मृत्यूविषयी आणि तिच्या मुलाविषयी सांगितलं. थिएटरबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचीही कल्पना दिली. मात्र तरीही त्याने तिथून जाण्यास नकार दिला”.
आणखी वाचा – अखेर अक्षय केळकरने दिली प्रेमाची कबुली, दहा वर्षे पूर्ण होताच ‘त्या’ खास व्यक्तीसह रोमँटिक व्हिडीओ केला शेअर
त्याचबरोबर तेलंगणाचे पोलिस प्रमुख जितेंद्र म्हणाले, “आम्ही वैयक्तिकरित्या अल्लू अर्जुन किंवा इतर कोणाच्या विरोधात नाही. पण लोकांच्या सुरक्षेपेक्षा चित्रपटाचे प्रमोशन महत्त्वाचे नाही. चित्रपटात ते हिरो आहेत, पण प्रत्यक्षात त्यांनी समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत”. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले आहे. संध्या थिएटरच्या बाहेर मोठा जनसमुदाय जमल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
अल्लू अर्जुन त्याच्या कारने तिथे पोहोचला तेव्हा रात्रीचे ९.३४ वाजले होते. तो त्याच्या कारच्या सनरूफ खिडकीतून बाहेर येतो आणि त्याच्या चाहत्यांना अभिवादन करतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी होत आहे. त्यानंतर अल्लू अर्जुन कारच्या सनरूफवर बराच वेळ उभा राहतो आणि मग अचानक चेंगराचेंगरी होते.