बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणजेच अभिनेता अक्षय केळकर हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे त्याचं आयुष्यचं बदललं. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षयने नाव कोरलं. अक्षयने आपल्या अभिनयाबरोबर उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात अक्षयची विनोदी शैलीदेखील पाहायला मिळाली. नुकताच तो कलर्स मराठीच्याच अबीर गुलाल या मालिकेतही झळकला होता. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अक्षय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे आणि हे कारण म्हणजे त्याची जीवनसाथी… (akshay kelkar girlfriend ram)
अक्षयने अनेकदा त्याच्या आयुष्यातील रमाबद्दल सांगितलं होतं. अनेकदा त्याने मुलाखतींमधून त्याच्या आयुष्यातील रमा विषयी भाष्य केलं होतं. मात्र ही रमा नक्की कोण याबद्दल त्याने कधी सांगितलं नव्हतं. अशातच आता अक्षयने त्याच्या आयुष्यातील रमाचा चेहरा समोर आणला आहे. अक्षयने अखेर गर्लफ्रेंड ‘रमा’ला सगळ्यांसमोर आणलं असून नुकताच त्याने ‘रमा’बरोबरचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. आज २३ डिसेंबरला त्यांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अक्षयने एक दिवस आधी ‘रमा’ कोण आहे? याचा खुलासा केला.
आणखी वाचा – ‘सुख म्हणजे…’ मालिकेच्या कलाकारांचा पुन्हा एक नवा शो येणार, महेश कोठारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “लवकरच…”
यावेळी त्याने असं म्हटलं की, “तर ही माझी रमा… आम्हाला १० वर्ष पूर्ण होत आहेत… म्हटलं एक दिवस आधीच सांगाव…म्हणून… बापरे! शेवटी सांगत आहे मी मी…पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही”. या व्हिडीओमध्ये, अक्षय आणि ‘रमा’ गप्पा मारताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘रमा’च्या केसात मोगऱ्याचा गजरा माळताना पाहायला मिळत आहे. या रोमॅंटिक व्हिडीओला चाहत्यांसह अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, अक्षयच्या ‘रमा’चं खऱ्या आयुष्यातील नाव हे साधना काकतकर असं आहे. ती गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर व समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. दरम्यान, आता अक्षय केळकरने दोघांच्या नात्याबद्दल जाहीर खुलासा केला आहे. त्यामुळे आता हे दोघे लग्नबंधनात कधी अडकणार? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.