दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची उत्सुकता चांगलीच वाढली होती. येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या समस्या काही संपायचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी हरियाणामधील एका व्यक्तीने अल्लू अर्जुनची अर्धनारीनटेश्वराच्या अवतारामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र याबद्दल अल्लू अर्जुनने काहीही भाष्य केले नाही. आशातच आता प्रदर्शनापूर्वी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. (allu arjun agianst compaint)
‘पुष्पा २’ प्रदर्शनाला आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. मात्र याआधीच अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील प्रमोशन इव्हेंटदरम्यान अर्जुनने त्याच्या चाहत्यांना आर्मी म्हणून संबोधलं. यामुळे श्रीनिवास गौड या व्यक्तीने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार हैद्राबाद येथील जवाहर नगर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. चाहत्यांना आर्मी हा शब्द उच्चारल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ग्रीन पीस एनव्हायरमेंट अँड वॉटर हार्वेस्टिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितलं की, “आम्ही टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आम्ही लिहिले की अभिनेत्याने चाहत्यांसाठी आर्मी या शब्दाचा वापर करु नये. आर्मीचा आदर करावा. ते आपल्यादेशाची सुरक्षा करतात. त्यामुळे तुम्ही चाहत्यांना या नावाने संबोधू शकट नाही. याऐवजी दुसऱ्या कोणत्याही शब्दाचा वापर करावा”.
दरम्यान मुंबईमध्ये प्रमोशन इव्हेंट मोठ्या दणक्यात पार पडला. यामध्ये अल्लू अर्जुनसह अभिनेत्री रश्मिका मंदना मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. या कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनने रश्मिकाचेदेखील खूप कौतुक केले आहे. अभिनेत्याने रश्मिकाला खूप चांगली व्यक्ती म्हंटले आहे. रश्मिकाने या चित्रपटासाठी खूप मेहनत केली असल्याचेदेखील त्याने सांगितले. तसेच श्रीवल्लीशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही असंही तो म्हणाला.