Aaradhya 13th Birthday : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. या सगळ्या चर्चांमध्ये हे दोघेही वेगवेगळे का होईना पण जाहीरपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. मध्यंतरी ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचा १६ नोव्हेंबरला वाढदिवस होता. तिच्या वाढदिवशी ऐश्वर्याने आराध्याबरोबरचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये अभिषेक कुठेच दिसला नव्हता. या फोटोंवरुन अभिषेकने मुलगी आराध्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली नसल्याचा अंदाज लावला जात होता पण हे सत्य नसल्याचं समोर आलं आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याने आराध्याचा १३ वा वाढदिवस एकत्र साजरा केला असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान काही नवीन व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यांनी या चर्चेची पुष्टी केली आहे. आराध्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांनी इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. हे समोर आलेले व्हिडीओ पाहून अभिषेकही पार्टीत उपस्थित असल्याची पुष्टी झाली. आराध्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याबद्दल अभिषेक आणि ऐश्वर्याने आयोजकांचे आभार मानले होते.
यावेळी अभिषेक व ऐश्वर्या यांनी वेगवेगळे व्हिडीओ बनवून लेकीच्या वाढदिवसाची चांगली व्यवस्था केल्याने आयोजकांचे आभार मानले. तो गेल्या १३ वर्षांपासून आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. ही अभिनेत्री आता बच्चन कुटुंबाबरोबर राहत नसल्याचे बोलले जात आहे. अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणताही सदस्य गेल्या अनेक महिन्यांत ऐश्वर्यासह दिसला नाही किंवा आराध्याच्या पार्टीतही दिसला नाही.
आणखी वाचा – आई होऊ न शकल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला टोमणे, नवऱ्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “मूल नसेल तर…”
अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये या अफवांवर संताप व्यक्त केला होता आणि म्हटले होते की, मी कुटुंबाबद्दल फार क्वचितच बोलतो, कारण ते माझे डोमेन आहे आणि त्याची गोपनीयता मी राखली पाहिजे. सर्व अफवा आहेत. हे अनुमान खोटे आहेत आणि त्यात तथ्य नाही”. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात नेमका वाद सुरु आहे का?, बच्चन कुटुंबात नेमक काय सुरु आहे याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र, या चर्चांमुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.