शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुष्पा २’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घोषणा आणि तोडफोड करत नुकसान, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 10:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushpa 2 premiere stampede case attack on Actor Allu Arjun house protesters detained by police

'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घोषणा आणि तोडफोड करत नुकसान

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १५ हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र हा चित्रपट तरीही चर्चेत आहे आणि या चर्चाही संमिश्र आहेत. एकीकडे पुष्पा बॉक्स ऑफीसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे तर दुसरीकडे प्रीमियर झालेल्या महिलेच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या लहान मुलाप्रकरणाला अजूनही पूर्ण विराम लागलेला नाही. या प्रकरणी काहीजण अल्लू अर्जुनला पाठिंबा देत आहेत, या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचे म्हणत आहेत. अशातच आता त्याच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. (Allu Arjun House Attack)

 हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अल्लू अर्जुनच्या घरावर रविवारी आंदोलकांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या घराबाहेर ठेवलेली भांडी फोडली, रागाच्या भरात संपूर्ण लॉन फाडले आणि टोमॅटो फेकण्यात आले. अन्य ठिकाणी अभिनेत्याचा पुतळाही जाळण्यात आला. आंदोलक पीडितेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांनी एकूण आठ आंदोलकांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.

BREAKING: Allu Arjun house protestors DEMAND ₹1⃣ cr for Pushpa 2⃣ stampede victim family. pic.twitter.com/pJTgQDDcM2

— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 22, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनच्या घरावर उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉइंट ॲक्शन कमिटीच्या (जेएसी) सदस्यांनी हल्ला केला.  ओयू जेएसीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या आंदोलकांनी रेवतीच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी घोषणाबाजी केली. अभिनेत्याच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनाही थांबवण्यात आले. हल्ल्यादरम्यान दगडफेकही करण्यात आल्याचे दावे करण्यात येत आहेत, मात्र याबद्दल खात्रीशीर माहिती समोर येणे बाकी आहे.

आणखी वाचा – अखेर अक्षय केळकरने दिली प्रेमाची कबुली, दहा वर्षे पूर्ण होताच ‘त्या’ खास व्यक्तीसह रोमँटिक व्हिडीओ केला शेअर

०४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरला अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गेला होता, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी जनसमुदाय उसळला होता. याचदरम्यान प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यामुळे झालेल्या एका अपघातात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा नऊ वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा – 23 December Horoscope : सोमवारचा दिवस नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने चांगला, लाभ अन् प्रगतीच्या संधी, जाणून घ्या…

दरम्यान, या घटनेनंतर अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. जखमी मुलावर उपचार करून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती, मात्र काही वेळात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेत त्याने परवानगीशिवाय तेथे गेलो नसल्याचे सांगितलं. अशातच आता त्याच्या घरावर हल्ला झाला आहे.  

Tags: allu arjun house attackattack on allu arjun housepushpa 2 stampede case
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Pushpa 2 Sandhya Theater stampede case Police released CCTV footage and said Allu Arjun continuing to watch the film after told that woman died

महिलेचा मृत्यू होऊनही थिएटरमध्ये 'पुष्पा २' बघत राहिला अल्लू अर्जुन, सीसीटीव्ही फुटेज हाती, पोलिसांचा मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.