Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आणि पहिल्याच आठवड्यात उत्कृष्ट कलेक्शन केले. दुसऱ्या वीकेंडलाही या ॲक्शन थ्रिलरवर पैशांचा पाऊस पडला आणि हा देशातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘पुष्पा 2: द रुल’ प्रदर्शित झाल्याच्या १२व्या दिवशी किती कलेक्शन झाले याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ ५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले असून दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षक या चित्रपटासाठी वेडे झाले आहेत. ‘पुष्पा 2: द रुल’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या १२ दिवसांत अनेक टप्पे पार केले आहेत आणि निर्मात्यांच्या तिजोरीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली असून त्याच्या कमाईचा वेग सध्यातरी थांबताना दिसत नाही. ‘पुष्पा 2: द रुल’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर नवव्या दिवशी ३६.४ कोटींची कमाई झाली. दहाव्या दिवशी ६३.३ कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी कमाई ७६.६ कोटी रुपये होती. आता प्रदर्शनाच्या १२व्या दिवशी ‘पुष्पा २: द रुल’च्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.
आणखी वाचा – पेशवाई लूक, शाही थाटमाट अन्…; ‘असा’ पार पडला ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचा लग्नसोहळा, Unseen Video व्हायरल
Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, १२ दिवसांत ‘पुष्पा 2: द रुल’ची एकूण कमाई आता ९२९.२५ कोटी रुपये झाली आहे. ‘पुष्पा २’ ने १२ दिवसांत तेलुगूमध्ये २८७.०५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५७३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४९.४ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.७ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.६ कोटी रुपये कमावले आहेत.
‘पुष्पा 2: द रुल’ने १२व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारच्या तुलनेत दुसऱ्या सोमवारी त्याच्या कलेक्शनमध्ये घट झाली असली तरीही ‘पुष्पा 2: द रुल’ने १२व्या दिवशी सर्व भाषांमध्ये २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदी भाषेत २१ कोटींची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. १२व्या दिवशी पठाणच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला नाही, ‘पुष्पा 2: द रुल’ हा १२व्या दिवशी विक्रम मोडणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक आहे.
‘पठाण’ची १२व्या दिवसाची कमाई २७.५ कोटी रुपये होती
‘पुष्पा 2: द रुल’ने १२व्या दिवशी हिंदी भाषेत 21कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बाहुबली २’ ने १२व्या दिवशी १५.७५ कोटींची कमाई केली
‘सुलतान’ने १२व्या दिवशी १५.८ कोटींची कमाई केली होती
‘जवाना’चे १२व्या दिवसाचे कलेक्शन १४.७५ कोटी होते
‘वॉर’ची १२व्या दिवसाची कमाई १३.२ कोटी रुपये होती
‘गदर २’ ने १२व्या दिवशी १२.१ कोटी रुपये कमवले
‘ॲनिमल’ची १२व्या दिवसाची कमाई १२ कोटी रुपये होती