Shashank Ketkar Mother : ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांक घराघरांत लोकप्रिय झाला. मालिकाविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. याशिवाय त्याने अनेक चित्रपट, वेबसीरिज, नाटक यांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतोय. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. बरेचदा तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतो. कुटुंबाबाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तसेच त्यांच्याबरोबरचे अनुभव तो शेअर करत असतो.
अशातच अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शशांकने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. याचबरोबर त्याने एक सुंदर असा व्हिडीओही शेअर केला आहे. शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आईच्या वाढदिवसानिमित्त तो त्यांना घेऊन खास पार्लरमध्ये गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्याने आईच्या केसांना कलर करुन त्यांचा सुंदर असा हेअरकट करुन घेतला आहे.
आणखी वाचा – पेशवाई लूक, शाही थाटमाट अन्…; ‘असा’ पार पडला ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचा लग्नसोहळा, Unseen Video व्हायरल
अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करत “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. आई होणं हे सगळ्यात अवघड आहे म्हणूनच तू स्वतःचे लाड कर आणि करुन घे”, असं म्हटलं आहे. शशांकने शेअर केलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर काही कलाकार मंडळींनी कमेंट करत शशांकच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“किती छान लहानपणी आई मुलांचे संगोपन करते आणि मुलं मोठी झाल्यावर आईचं मुलं वेगवेगळ्या पद्धतीने तिची सेवा करतात. शशांक तर खूप गोड गुणी मुलगा आहे. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शशांकच्या आईंना शुभेच्छा”, “आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू”, “असंच आईवर कायम प्रेम करत राहा. तुला कधीच काही कमी पडणार नाही”, असं म्हणत अनेकांनी शशांकच कौतुक केलं आहे.