सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, दु:ख अनावर, म्हणाली, “काय बोलावं, काय करावं, सुचत नाही आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 17, 2024 | 9:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame actress Purva Kaushik shared an emotional post on social media after the death of a special person close to her.

शिवा फेम पुर्वा कौशिकच्या जवळच्या खास व्यक्तीचे निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सर्वांची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पुर्वा कौशिक. पुर्वाने आपल्या डॅशिंग अभिनयाने सर्वांना भुरळ घातली आहे. पण नुकतंच तिच्या जवळच्या एका खास व्यक्तीचे निधन झाले आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. निधन झालेली ही व्यक्ती अभिनेत्रीची सासू असल्याचे म्हटलं जात आहे. पुर्वाने याबद्दल एक मोठी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Purva Kaushik Close Person Death)

त्या खास व्यक्तीबरोबरचे फोटो शेअर करत पुर्वाने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “एक नातं जन्माने, परिस्थितीने तयार होतं ते रक्ताच नातं. त्याला आपण नातेवाईक नाव देतो. हे सर्वसामान्य आहेच. पण एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे, समजून उमजून सांभाळतो. त्या नात्याला काय नाव द्यायचं, हे कधी मुळात मला कळलंच नाही. तसंच आई तुमचं आणि माझं हे नातं आहे. मन खूप भरून आलं आहे, डोकं जड झालं आहे. काय बोलावं, काय करावं कळत नाही. मग एक जाणवलं, तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं असंत. तर लिहिलं असतं! तर तसच काहीस वाटतंय. आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात”.

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

आणखी वाचा – आजीच्या बिघडलेल्या तब्येतीसाठी सूनांनी लीलाला ठरवलं जबाबदार, काय असणार एजेंचा निर्णय?, नात्यात नवीन वळण

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “पंचवीशीनंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली, अनुभवली. जी माझी मैत्रीण, आई, सासू, बहीण सगळं होतं. मी खूप कधी व्यक्त झाले नाही. माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात. मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती, आहे आणि आयुष्यभर असेल. आता या क्षणाला कसं, काय, कुठून बोलावं तेही कळत नाहीये. डोळ्यासमोरुन सहा वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेससारखा जात आहे”.

आणखी वाचा – 17 December Horoscope : शुभ संयोगामुळे नोकरदारांसाठी मंगळवारचा दिवस भाग्याचा, बढती व पगारवाढीची शक्यता, जाणून घ्या…

यानंतर पुर्वाने असं लिहिलं आहे की, “तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान, शांत, मनमोकळेपणाने राहा. तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा. अमुलचं आईस्क्रीम खा. आता अडवायला येणार नाही. हे खा, ते खाऊ नका, असं म्हणणार नाही. मी तुमच्या माझ्याबरोबरच्या आठवणी कायम माझ्याबरोबर ठेवणार आहे. माणूस म्हणून प्रवास सुरुच राहणार आहे. कळत-नकळत तुमच्यासारखी होण्याचा, असण्याचा प्रयत्न होत असतो, तो आयुष्यभर करत राहणार आहे. माझ्याबरोबर राहा बस. एवढंच. तुमची पूर्वा”.

Tags: kaushik purvaPurva KaushikPurva Kaushik Close Person Deathpurva kaushik phadke
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Sonakshi Sinha On Mukesh Khanna

शत्रुघ्न सिन्हा यांच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित करताच लेक भडकली, मुकेश खन्नांना दिलं चोख उत्तर, म्हणाली, "पुढच्या वेळी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.